Monday, June 17, 2024
Homeक्राइमपोलिसाने स्वतःच फेसबुकवर भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम' अशी पोस्ट करून स्वत:वरच झाडल्या तीन...

पोलिसाने स्वतःच फेसबुकवर भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी पोस्ट करून स्वत:वरच झाडल्या तीन गोळ्या…

सोलापूर: सोलापूर जिल्हा कारागृहात शनिवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. जेलमधील शिपाई विकास गंगाराम कोळपे (वय ३४, नेमणूक, सोलापूर जिल्हा कारागृह, रा.कारागृह वसाहत, सोलापूर) या कारागृह कर्मचाऱ्याने स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी फेसबुकवर स्वतःचा फोटो आणि स्वतःलाच श्रद्धांजली अर्पण करून आत्महत्या करत असल्याची पोस्ट करून स्वत:वरच गोळ्या घालून घेतल्या. कारागृह कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःची जन्म तारीख आणि मृत्यू तारीख लिहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करून आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती पोस्ट केली.

स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून स्वतः लाच श्रद्धांजली अर्पण
करत स्वत:वरच झाडल्या तीन गोळ्या – विकास कोळपे यांनी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वतःच्या छातीत गोळ्या घालून घेतल्या. गोळ्या घालून घेण्याअगोदर विकास कोळपे या पोलिस कर्मचाऱ्याने फेसबुकवर पोस्ट केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत आत्महत्या करत असल्याची माहिती पोस्ट केली. स्वतःची जन्मदिनांक आणि मृत्यू दिनांक लिहिली. स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. भावनिक पोस्टमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://www.facebook.com/100034922453927/posts/1076008610239877/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v

छातीत गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला -विकास कोळपे कारागृहातील या पोलिस शिपायाने शनिवारी सायंकाळी स्वतःच्याच छातीत गोळ्या झाडून घेतल्या. ही बाब कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच विकास कोळपे यास शासकीय रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल केले. डॉक्टरांनी ताबडतोब विकास कोळपे यांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले. काही वेळानंतर नातेवाईकांनी विकास यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. विकास कोळपे हे सांगली, पुणे, अहमदनगर येथे तैनात होते. ते जुलै २०२१ पासून सोलापूर जिल्हा कारागृहात तैनात होते.

विकास कोळपे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील रहिवासी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची सोलापुरातील जिल्हा कारागृहात बदली झाली होती. त्यांनी यापूर्वी २०१३ मध्ये कोल्हापूर, २०१६ येरवडा कारागृह (पुणे), २०१७ अहमदनगर, २०१९ सांगली आणि २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा कारागृहात मुख्य प्रवेशद्वारात गार्ड म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वतःजवळील एसएलआर बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!