Saturday, November 2, 2024
Homeक्राइमपुणे पोलिसांनी पकडला त्र्याहत्तर लाख पंच्याऐंशी हजार चारशे रुपयांचा गुटखा व...

पुणे पोलिसांनी पकडला त्र्याहत्तर लाख पंच्याऐंशी हजार चारशे रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल

विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे – दिनांक २४ जून

किकवी (ता.भोर) गावाजवळील मोरवाडी गावच्या हद्दीतील असणाऱ्या फॉरेस्टच्या क्षेत्रात एका आयशर टेम्पोमध्ये गुटखा असून तो आडबाजूला लावून ठेवला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक अंकित गोयल ( Ankit Goyal) यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस स्टेशनची संयुक्त टीम तयार करून त्या टिमव्दारे संयुक्तरित्या मोहीम राबवून एक विटकरी ( तपकीरी) रंगाचा टेम्पो नं. एम. एच. १२ एम.व्ही. ८२४७ ताब्यात घेण्यात आल्यावर त्यामध्ये विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, सुगंधी तंबाखू असे प्रतिबंधीत पदार्थाचा माल, मोबाईल फोन व आशयर टेम्पो असा एकुण ७३,८५,४००/- किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. Gutkha worth seventy three lakh eighty five thousand rupees was seized by the pune police
कारवाई दरम्यान इसम नामे ऋत्विक दशरथ मोरे, (वय २४ वर्षे), व्यवसाय क्लिनर रा. मोरवाडी, पो.किकवी, (ता. भोर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर गुटख्याचा माल हा सुधाकर कल्याण पानसरे, दिनेश कल्याण पानसरे दोघे (रा. शिवरे, ता. भोर जि.पुणे) यांच्यासह मिळून पुणे येथील निजाम याचेकडे घेउन जात असल्याचे निष्पन्न झालेले असून त्या सर्वाविरोधात राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(pune Crime News)
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण हे करीत आहोत. (Pune crime news)

सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग तानाजी बर्डे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक फौजदार हनुमंत पासलकर, पोलीस हवालदार महेश बनकर, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अजय घुले, प्रमोद नवले, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, व राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन खामगळ, पोलीस नाईक नाना मदने, मयुर निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश राजीवडे यांनी केली.(pune Crime News)

Gutkha worth seventy three lakh eighty five thousand rupees was seized by the pune police

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!