Saturday, June 22, 2024
Homeइतरपै तुषार डुबे ठरला शिरुर - हवेली मल्लसम्राट कीताबाचा मानकरी

पै तुषार डुबे ठरला शिरुर – हवेली मल्लसम्राट कीताबाचा मानकरी

स्पर्धेतील विजेत्या पैलवानास चांदीची गदा व प्रशस्तिपत्रक देताना मान्यवर

कोरेगाव भीमा – लोणीकंद ( ता.हवेली)पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप फ्ट कंद यांच्या वाढदिवसानिमित्ताने ७ व ८ मे रोजी लोणीकंद येथे शिरुर  – हवेली मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेत कीताबाच्या लढतीमध्ये दौंडच्या पै तुषार डुबे याने इंदापुरच्या बाबासाहेब तरंगेला पराभुत करुन शिरुर – हवेली मल्लसम्राट कीताबाचा मान पटकावला.  

भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व दौंड चे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पै तुषार डुबे यास मानाची गदा व रोख पारितोषिक देण्यात आले यावेळी प्रदीप कंद , रोहीदास उंद्रे  , धर्मेन्द्र खांडरे , सुभाष जगताप , गणेश ताठे ,  स्वप्निल उंद्रे , दादासाहेब फराटे , सुदर्शन चौधरी , प्रविण काळभोर , दादासाहेब सातव , अमोल शिवले  ,  गणेश चौधरी , नितिन गावडे , विजय जाचक , संदीप सातव , कांत कांचन , अनिल सातव , भगवान शेळके , सुधीर फराटे , संजय पाचंगे , पै मेघराज कटके , पै पांडुरंग खानेकर , बाबासाहेब चौधरी , रविंद्र कंद  व इत्यादी कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी व भाजपा नेते व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित  होते  .    या स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै संदीप भोंडवे , पुणे जिल्हा भाजपा सरचिटणिस श्री धर्मेंद्र खांडरे , शिरुर तालुका भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनावणे , पंचायत समिती सदस्य शामराव गावडे , सरपंच सचिन शेलार , बाबासाहेब दरेकर व हनुमंत कंद यांनी केले होते व स्पर्धेचे संयोजन निळोबा कंद , कीरण शिंदे , सुधीर शिंदे , सोहम शिंदे , स्वप्निल कंद , सागर शिंदे , रतीकांत जगताप  यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब झुरुंगे यांनी केले .

   उर्वरीत गटातील विजेते पुढील प्रमाणे ५० कीलो – प्रथम – सनी फुलमाळी ,  द्वितीय  –   अमोल करे ५४ कीलो – प्रथम – राहुल हरगुडे,द्वितीय – अमित कुलाळ ५७ कीलो – प्रथम -धनंजय साबळे , द्वितीय – गौरव घाडगे ६१ कीलो – प्रथम – रितेश दरेकर , द्वितीय – निरंजन शिंदे  ६५ कीलो प्रथम – सौरभ शिंदे ,द्वितीय – सचिन दातार  ७० कीलो  प्रथम – आबा शेंडगे , द्वितीय – – प्रथमेश वाघमारे  ७४ कीलो – प्रथम – करण फुलमाळी,द्वितीय – यश शिंदे ७९ कीलो – प्रथम -शुभम थोरात ,  द्वितीय – अविनाश गायकवाड  खुला गट – प्रथम -पै तुषार डुबे ,द्वितीय  –  बाबासाहेब तरंगे        

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!