Monday, September 16, 2024
Homeताज्या बातम्यापेरणेफाटा येथे विजयस्तंभासमोर ट्रक व प्रवासी बसचा भीषण अपघात

पेरणेफाटा येथे विजयस्तंभासमोर ट्रक व प्रवासी बसचा भीषण अपघात

दोन जण जखमी तर तीन बसचे नुकसान, पोलिसांनी तत्परतेने वाहतुक केली सुरळीत

कोरेगाव भीमा – दिनांक २६ डिसेंबर

पुणे-नगर रस्त्यावर पेरणेफाटा (ता.हवेली)येथे विजयस्तंभा समोर रात्री ११ चे सुमारास मालवाहू ट्रकने तीन प्रवासी बसेसला धडक दिल्याने बसमधील दोघे जखमी झाले तर इतर प्रवाशांना किरकोळ मार लागला. या अपघातात ( Accident) एका बसचे मोठे नुकसान झाले. तर ट्रकसह इतर दोन बसेसचेही काही प्रमाणात नुकसान झाले.

या अपघातात पुण्याहून परभणीला जाणाऱ्या साई ट्रॅव्हल्सची बस (एम. एच.२३ डब्ल्यू १८७७) या बसला मालवाहू ट्रकने (एम. पी. ०९ एच. एच. ३६०३) ट्रकने मागून ठोकरल्याने मोठे नुकसान झाले. या अपघातात (Accident) ट्रकने सुरवातीला श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या पुणे ते सोनपेठ या लक्झरी बसलाही धक्का देत पुढील बसला ठोकरले. तर पुढे जाऊन आणखी एका खाजगी बसला धडक दिली. हा अपघात ११ वाजण्याच्या सुमारास झाला. यावेळी विजय रणस्तंभ परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करत जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.ट्रक चालकाला लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे.या अपघातात खेलबा विठ्ठल पालखे, (रा. वाघझरी ता.परळी, जि.बीड) याच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे.

घटनेचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, पोलीस नाईक निर्णय लांडे, विनायक साळवे, पोलीस शिपाई प्रीतम वाघ, शुभम सातव, प्रमोद शिंदे, दीपक कोकरे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजुला करीत वाहतुक सुरळीत केली

ट्रक व ट्रॅव्हल यांचा अपघात झाल्यावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम झाले होते तसेच ट्रक व बसच्या काचांचा खच पुणे नगर महामार्गावर पडला होता.यावेळी पोलिसांना मदत कार्य करताना बघ्यांमुळे येत होता तर दुसरीकडे ट्रॅफिक जॅम न होऊ न देण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. लोणीकंद पोलिसांनी तातडीने क्रेन बोलावत बस रस्त्यावरून बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!