Thursday, June 20, 2024
Homeक्राइमपुण्यात गँग रेप…! विवाहितेवर चौघांनी मिळून केला बलात्कार, आंबेगाव तालुक्यातील खळबळजनक घटना

पुण्यात गँग रेप…! विवाहितेवर चौघांनी मिळून केला बलात्कार, आंबेगाव तालुक्यातील खळबळजनक घटना

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या घोडेगाव गावाजवळ असणाऱ्या अज्ञात ठिकाणी नेऊन चौघांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक व खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण आंबेगाव तालुका हादरला आहे. या प्रकरणात घोडेगाव पोलिसांनी चौघांपैकी एकाला बेड्या ठोकल्या आहे. याबाबत घोडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
Gang rape in Pune…! A married woman was raped by four together, a sensational incident in Ambegaon taluka

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.२३जून रोजी पीडित २२ वर्षीय महिला त्यांच्या प्रियकरासोबत मोटारसायकल वरून अज्ञात ठिकाणी जात होते.त्यावेळी मोटरसायकल वरून संदेश अशोक जाधव, संजय आणि आदेश अशोक जाधव हे तिघे आले. त्यांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अंगावरील कपडे काढून आळीपाळीने सामूहिकरीत्या बलात्कार केला. “याबाबत जर कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी दिली.
Gang rape in Pune…! A married woman was raped by four together, a sensational incident in Ambegaon taluka

या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने घोडेगाव पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चार आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. संदेश जाधव, संजय, आदेश जाधव, आणि चंद्रकांत भालेराव अशी अत्याचार करणाऱ्या नराधमांची नावे आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत  चौघांविरोधत तक्रार दाखल केली. यातील आकाश चंद्रकांत भालेराव याला पोलिसांनी पकडले असून तिघांचा तपास सुरू आहे. 

नेमकं काय घडलं?
पीडीत महिला २२ वर्षांची आहे. ही महिला वीवाहित आहे. तिचे एका तरुणासह प्रेमसंबध आहेत. प्रियकराने तिला भेटायला बोलवले होते. यावेळी प्रियकराच्या चार मित्रांनी डोंगराळ भागातील जंगलात निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी देत या चौघांवनी बलात्कार केल्याचे महिलेने पोलिस तक्रारीत म्हंटले आहे.


सदर गुन्हा पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांनी दाखल केला आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम करत आहे.

या घटनेनं आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून घोडेगाव पोलिसांनी गँग रेपचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!