Saturday, May 25, 2024
Homeक्राइमधक्कादायक..पुण्यात 'एसीपी'कडून पत्नी अन् पुतण्याची गोळ्या घालून हत्या करत स्वतःलाही संपवलं….

धक्कादायक..पुण्यात ‘एसीपी’कडून पत्नी अन् पुतण्याची गोळ्या घालून हत्या करत स्वतःलाही संपवलं….

पुणे – पुणे पोलिस दलात अत्यंत खळबळजनक घटना घडली अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी पुण्यात राहणाऱ्या पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला आहे. खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. (Amaravati Police) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.(In Pune, ‘ACP’ shot dead his wife and nephew and also killed himself….)

अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड (Acp Bharat Gaikwad)यांनी पुण्यात राहणाऱ्या पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला आहे. खुनानंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.(In Pune, ‘ACP’ shot dead his wife and nephew and also killed himself….)

पत्नी मोनी गायकवाड (वय ४४), पुतण्या ॲड .दीपक गायकवाड (वय ३५) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ॲड दिपक गायकवाड हे वकील असून पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करत होते.
(In Pune, ‘ACP’ shot dead his wife and nephew and also killed himself….)

     घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.स्थानिक पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!