कोरेगाव भिमा – लोणी काळभोर (ता.हवेली) येथे एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला कपडे धुण्यासाठी रुममवर बोलावून घेत तिच्यावर एका नराधमाने अत्याचार केला आहे.पुण्यातील लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली आहे.(pune Crime News)
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सुदर्शन शेरमाळे (मुळ रा. मनमाड जि. नाशिक सध्या रा. हांडेवाडी ता. हवेली) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा नाशिक जिल्ह्यातील असून हांडेवाडी येथे रूम भाड्याने घेऊन राहतो.नोव्हेंबर महिन्यात आरोपीने पीडित मुलीला कपडे धुण्याच्या बहाण्याने रूमवर बोलवून घेतले.(Pune Crime News)
यानंतर त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच तीन वेगवेगळ्या दिवशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी घडला आहे.
दरम्यान, आरोपीचं कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिकचा लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.