Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्यापुण्यातील शिवजयंती महोत्सवामध्ये ९१ स्वराज्य रथांची भव्यदिव्य मिरवणुक सोहळा

पुण्यातील शिवजयंती महोत्सवामध्ये ९१ स्वराज्य रथांची भव्यदिव्य मिरवणुक सोहळा

यावर्षी सरलष्कर दरेकर घराण्याचा रथ सहभागी होण्याचा मान

आंबळे ( ता.पुरंदर ) येथील मूळ निवासी तसेच शिरूर तालुक्यातील सणसवाडी ,दरेकरवाडी,करंदी, मांडवगण फराटा ,हवेली तालुक्यातील वढू खुर्द, बारामती तालुक्यातील वडगाव, अहमदनगर श्रीगोंदा येथील वंशज या सोहळ्यात होणार सहभागी

पुणे – शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा पर्व १२ वे मध्ये ९१ स्वराज्यारथांची भव्यदिव्य मिरवणूक सोहळा होणार असून. छञपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्या घराण्यांनी स्वराज्यासाठी त्याग,बलिदान करत शौर्य गाजवले व स्वराज्य उभारणीत आपले योगदान दिले त्यांचा स्वराज्यरथ सहभागी होणार असून यावेळी आंबळे ( ता.पुरंदर ) येथील मूळ निवासी असलेले व सध्या पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यातील सणसवाडी ,दरेकरवाडी,करंदी, मांडवगण फराटा ,हवेली तालुक्यातील वढू खुर्द, बारामती तालुक्यातील वडगाव, अहमदनगर श्रीगोंदा येथील वंशज या सोहळ्यात सहभागी होणार असून स्वराज्यरथ मिरवणुकीत ६९ व्या क्रमांकाचा रथ सरलष्कर दरेकर घराण्याचा स्वराज्य रथ सहभागी होणार आहे. लालमहाल येथे पाळणा तर एसएसपीएमएस शाळा पुणे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा यांच्या पुतळ्यावर हेलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी सोहळा होणार आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योगमंत्री नामदार उदय सामंत, खासदार सुप्रीयाताई सुळे, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक,आमदार दिलीप मोहिते, आमदार संग्राम थोपटे,आमदार शशीकांत शिंदे,आमदार संजय जगताप ,आमदार सिध्दार्थ शिरोळे, बीव्हीजी उद्योगसमूहाचे हणमंत गायकवाड,पोलीस उपायुक्त परिमंडळ १ चे संदीप गिल्ल ,ॲड. प्रतापदादा परदेशी व ९१ स्वराज्य रथ घराण्याचे वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

या स्वराज्य रथासाठी सरलष्कर दरेकर यांचे पुणे जिल्ह्यातील वंशज उपस्थित राहणार असल्याची माहिती निलेश दरेकर,सचिन दरेकर,प्रशांत दरेकर, अश्विनी दरेकर, निलेश बाळकृष्ण दरेकर, माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, तुकाराम दरेकर यांनी दिली

सरलष्कर दरेकर यांचा वाडा

पराक्रमी दरेकर घराण्याचा गौरवशाली इतिहास – श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या हशम मावळे पायदळाचे सरदारांच्या यातील दरेकरांचे तीन सरदार होते. १)गणोजी दरेकर २) येसाजी दरेकर ३) बाळाजीराव दरेकर यांचे वारस सुभानजी, गोरखोजी, मानाजी ,गोरोजी यांना अनेक गावांचे मोकासे होते.छत्रपती शाहू महाराजांनी सयाजी दरेकर यांना भोसरे, वडखळ , लोणी,महिमानगड, वर्धन गड तसेच खटावखातगुन आणि सुभान जी दरेकर यांना आंबळे हे वतन दिले होते.दरेकर हे शाहूंच्या दरबारात हरी मोरेश्वर राजाज्ञा यांच्या सैन्यात शिलेदार होते. महाड च्या ठाण्यावर बंदोबस्तास बालकोजीराव यांना ठेवल्याचा उल्लेख आढळतो.

सरलष्कर खंडोजी दरेकर श्री खंडेराव दरेकर पानिपतच्या युद्धात मृत्यू पावलेल्या दादाजी दरेकर यांचे नातू आणि जयाजी दरेकर यांचे पुत्र होते. सन १७९५ मध्ये निजामा बरोबर झालेल्या खर्ड्याच्या लढाईत खंडेराव दरेकर यांचे सुपुत्र हनुमंतराव दरेकर यांनी पराक्रम केला.

खंडेराव दरेकर यांनी पिसाळलेल्या हत्तीपासून माधवराव पेशवे यांचा जीव वाचवला पेशवे काळातच पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन, कर्नाटक खान्देश येथे झालेल्या मराठ्यांच्या लढायात प्रमुख सरदारमध्ये दरेकर यांचा समावेश होता.

पानिपतच्या मोहिमेत तरुण दादाजी दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दरेकरांचे पथक होते ते भाऊसाहेब पेशव्यांच्या अनेक सल्लामसलती मध्ये सहभागी होते पानिपतावर पराक्रमाची शर्थ करून दादाजी दरेकर यांनी पानिपतावर देह ठेवला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!