Friday, May 24, 2024
Homeक्राइमपुण्यातील वाघोली येथे जन्मदात्या वडिलांनी पोटच्या  मुलीवर कुऱ्हाडीने  वार करत केली...

पुण्यातील वाघोली येथे जन्मदात्या वडिलांनी पोटच्या  मुलीवर कुऱ्हाडीने  वार करत केली निर्घृण हत्या

कोरेगाव भीमा – वाघोली (ता.हवेली) येथे जन्मदात्या वडिलांनी केली पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने  वार करत केली निर्घृण हत्या केल्याने पुण्यात खळबळ माजली आहे.  पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

        लोणीकंद पोलिसांनी येथे मुलीचे काका यांनी तक्रार दिली असून बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मिलचे धराशिवचे असलेले किती सध्या वाघोलित राहण्यास असूनंवडुल सेंट्रिंग चे काम तर आई घर काम करते. मुलीच्या वडिलांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती नाही. पण वाघोली परिसरात या खूनाबद्दल चर्चा सुरु आहे. 

     बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलांने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. १५ वर्षीय पोटच्या मुलीला वडिलांनी अतिशय निर्घूणपणे संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत झालेल्या मुलीचं नाव अक्षदा फकीरा दुपारगुडे असल्याचं समजतेय. दुपारगुडे हे सध्या वाघोली येथे वास्तव्यास असून, ते मूळचे सोलापूर येथील आहेत.

पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने वाट करत केली निर्घृण हत्या –   जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यात, हातावर, पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी ससून येथे नेले जात होते, पण तिचा मृत्यू झाला. अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. वडिलाने पोटच्या मुलीला का संपवलं, याबाबतचं कारण अस्पष्ट आहे.

  याबाबत पीडित मुलीच्या काकांच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठपुण्यातील वाघोली येथे जन्मदात्या वडिलांनी केली पोटच्या  मुलीवर कुऱ्हाडीने  वार करत केली निर्घृण हत्या पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत. आरोपी बाप फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!