कोरेगाव भीमा – वाघोली (ता.हवेली) येथे जन्मदात्या वडिलांनी केली पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने वार करत केली निर्घृण हत्या केल्याने पुण्यात खळबळ माजली आहे. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
लोणीकंद पोलिसांनी येथे मुलीचे काका यांनी तक्रार दिली असून बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मिलचे धराशिवचे असलेले किती सध्या वाघोलित राहण्यास असूनंवडुल सेंट्रिंग चे काम तर आई घर काम करते. मुलीच्या वडिलांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती नाही. पण वाघोली परिसरात या खूनाबद्दल चर्चा सुरु आहे.
बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलांने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. १५ वर्षीय पोटच्या मुलीला वडिलांनी अतिशय निर्घूणपणे संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत झालेल्या मुलीचं नाव अक्षदा फकीरा दुपारगुडे असल्याचं समजतेय. दुपारगुडे हे सध्या वाघोली येथे वास्तव्यास असून, ते मूळचे सोलापूर येथील आहेत.
याबाबत पीडित मुलीच्या काकांच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठपुण्यातील वाघोली येथे जन्मदात्या वडिलांनी केली पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने वार करत केली निर्घृण हत्या पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत. आरोपी बाप फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.