Thursday, June 20, 2024
Homeक्राइमपुण्यातील धक्कादायक घटना.. जेवण वाढताना वाद ..पत्नीने केले पतीवर वार

पुण्यातील धक्कादायक घटना.. जेवण वाढताना वाद ..पत्नीने केले पतीवर वार

पुणे – पुण्यातील भवानी पेठेत एक धक्कादायक घटना घडली असून जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Crime News)

रविवारी रमेश ससाणे कामावरुन घरी जेवण करण्यासाठी आले. त्यावेळी जयाने त्यांच्याकडे ५०० रुपये मागितले. पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पत्नी जयाने जेवण वाढताना ताट आणि तांब्या आपटला. त्यामुळे रमेश ससाणे यांनी तिला चापट मारली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. जयाने रमेश यांच्या दंडावर व पाठीवर चाकूने वार केले. सहायक फौजदार भाेसले तपास करत आहेत.(Pune Crime News)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!