Monday, June 17, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?पुणे नगर महामार्गावरील अपघात थांबण्यासाठी माजी सरपंच राहुल गव्हाणे यांचे मुख्य अभियंता...

पुणे नगर महामार्गावरील अपघात थांबण्यासाठी माजी सरपंच राहुल गव्हाणे यांचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना निवेदन

पुणे नगर महामार्गावर नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पथदिवे, मोठे हायमास्ट व कोरेगाव भिमा येथील पुलाच्या वळणाला सिमेंट काँक्रिट कठडे बसवण्याची मागणी

कोरेगाव भिमा  – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून यामध्ये तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत  अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे यामुळे नागरिकांच्या व प्रवाशांच्या जिवितासाठी कोरेगाव भीमा येथीलभीमा नदी वळणावर सिमेंट काँक्रिट कठडे,पथदिवे व सूचना फलक बसवण्यासाठी डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे यांनी बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण यांना निवेदन दिले आहे.

माजी सरपंच राहुल गव्हाणे यांनी बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण यांना दिलेल्या  निवेदनात ,”पुणे अहमदनगर मार्गावर मोठ्या प्रमाणात दळणवळण असून कोरेगाव भीमा येथे अहमदनगर कडे जाताना भीमा नदी तीव्र वळण आहे. सदर वळण लक्षात न आल्याने तसेच पूलावर कठडे नसल्याने या भागात वारंवार अपघात होत आहे. या भागात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी पुलावर दोस्ती टेलरपर्यंत कायमस्वरूपी सिमेंटचे चार फुट रेलिंग उभारावे. तसेच रात्रीच्या प्रसंगी येथे अंधार असल्याने या ठिकाणी पथदिवे आणि वाहन चालकांना दिसेल असे सूचनाफलक बसवल्यास या भागात होणारे अपघात रोखण्यास मदत होईल.”

तसेच डिग्रजवाडी फाटा, वाडा पुनर्वसन फाटा, कल्याणी कंपनी फाटा, सणसवाडी गाव मुख्य चौक, एल अँड टी फाटा, येथे वारंवार अपघात होत असल्यामुळे मोठे हायमास्ट उभारणे, त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा येथील वढू बुद्रुक चौक डांबरीकरण करणे, महामार्गास जोडणारे रस्ते तातडीने जोडणे आवश्यक आहे.

तरी आपणास विनंती की शिरुर तालुक्यातील पुणे नगर महामार्गावरील खालील कामे तातडीने करणेसाठी संबधितानां योग्य ते आदेश व्हावेत, ही विनंती.

१. पुणे – अहमदनगर रस्त्यावर भीमा नदीवरील कोरेगाव भीमा येथे नगर कडे जाताना दोस्ती टेलर पर्यंत कायम स्वरूपी सिमेंट काँक्रीटचे कठडे, मोठा पथदिवा व सूचनाफलक लावणे.

२. डिग्रजवाडी फाटा, वाडा पुनर्वसन फाटा, कल्याणी कंपनी फाटा, सणसवाडी गाव मुख्य चौक, एल अँड टी फाटा येथे मोठे हायमास्ट उभारणे.

३. कोरेगाव भीमा येथील वढू बुद्रुक चौक डांबरीकरण करणे, महामार्गास जोडणारे रस्ते तातडीने जोडण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

 मोठ्या प्रमाणात होणारे अपघात,ठिकठिकाणी सुरू असलेली कामे ,दुभाजक असो की चौका चौकात रखडलेली सूचना फलक, पथदिवे, पांढरे पट्टे , अत्यावश्यक गतिरोधक,इतर कामे, रंबलिंग पट्टे असो की पथदिवे न बसावल्याने होणारे अपघात याला जबाबदार धरायचे कोणाला ? आजही सर्वसामान्य लोक आपल्या नशिबाला व देवाला दोष देतात पण बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अनेक कर्ते, घरातील तरुण मुलगा गमावल्याने त्या कुटुंबाचे होणारे नुकसान कोण भरणार ?? बांधकाम विभाग आता तरी नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवणार का ? की तरुणांचा जाणारा बळी आपल्या डोळ्यावर गलथान कारभाराची काळी फित बांधून  पाहत राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे.तरुणांचे  व कुटुंबातील कर्त्या माणसाचे निधन मनाला अस्वस्थ करते यासाठी बांधकाम  विभागाला योग्य त्या काळजी व  आवश्यक कामे करण्यासाठी निवेदन दिले आहे. नागरिकांच्या व प्रवाशांच्या जीवितासाठी व सुरक्षिततेसाठी तातडीने कामे करण्यात यावी. – माजी सरपंच राहुल गव्हाणे, डिंग्रजवाडी

.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!