Saturday, July 27, 2024
Homeन्याययुवापुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात रंगणार 'महाराष्ट्र केसरी २०२३-२४'चा थरार

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात रंगणार ‘महाराष्ट्र केसरी २०२३-२४’चा थरार

संयोजक प्रदीप कंद व पै. संदीप भोंडवे यांची पत्रकार परिषदेत माहिती; ९०० कुस्तीगीरांचा सहभाग

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या आणि वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार असून यावर्षी स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून, पुणे जिल्ह्यातील लोणीकंद-फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा भव्य स्वरूपात होईल, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे मुख्य संयोजक सोमेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक प्रदीप कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, आशियाई सुवर्णपदक विजेता पै रविंद्र पाटील , महाराष्ट्र केसरी पै.बाप्पुसाहेब लोखंडे , पै. सईद चाऊस पै.अस्लम काझी तसेच पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे यांच्यासह पदाधिकारी, कुस्तीगीर उपस्थित होते.यावेळी, “नगर रोडवर पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे नियोजन अतिशय देखण्या स्वरुपात करण्याचा आमचा मानस आहे. २००९-१० मध्ये आम्ही हिंदकेसरी स्पर्धा घेतली होती. त्यामुळे कुस्ती स्पर्धा भरविण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील सर्व पैलवान आंनदी होतील, अशा स्वरुपात स्पर्धेचे आयोजन होईल. पदकप्राप्त कुस्तीगीरांना रोख स्वरुपात बक्षिसे देण्याची नियोजन असल्याची माहिती प्रदिप कंद यांनी दिली.

“सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात करणार आहेत. ३५ जिल्ह्यातील आणि ११ महापालिकामधील ४६ जिल्हा तालीम संघातील ९०० ते ९२५ मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह महाराष्ट्र केसरी वजनगटामध्ये नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी आहे. आपल्या मल्लांनाही या स्पर्धेचा निश्चित फायदा होणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार असल्याचे,” पै. संदीप भोंडवे यांनी नमूद केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!