जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २४१ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध .. ३१ जुलै शेवटची तारीख
पुणे – पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरामधील अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत ११ परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात २५ रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर उपलब्ध आहे.
या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित परिमंडळ कार्यालयात याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याने नागरिकांनी वेळेत विहित अर्ज दाखल करण्याची अवशक्यता आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबधित विभागाशी संपर्क करण्यात यावा.
जिल्ह्यातील १३ तालुक्यात २४१ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामापुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २४१ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावे – जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर ( Pune District Appeal to apply for cheap grain shop licence )