Friday, July 12, 2024
Homeइतरपुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ७२ लाख ५५ हजारांचा निधी...

पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ७२ लाख ५५ हजारांचा निधी मंजूर

आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सुरू – पंडित दरेकर

कोरेगाव भीमा – दिनांक ४ जुलै

सणसवाडी ( ता.शिरूर) आमदार अशोक पवार,माजी सभापती सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पंडित दरेकर निधीतून ७२लाख ५५ हजार रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर केल्याबद्दल सणसवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. आमदार अशोक पवार यांचा विकास कामांचा आलेख उंचावत असताना त्यांचे निकटवर्तीय पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे

मंजूर विकासकामे –

१) सणसवाडी येथील पिंपळे जगताप ते साईनाथ नगर ( म्हसोबा नगरी ) रस्ता १० लक्ष

२) वसेवाडी शाळा इमारत दुरुस्ती ( सणसवाडी ) १९.७६ लक्ष

३) सणसवाडी येथील तळेगाव रस्ता ते सराटे वस्ती रस्ता बनविणे १५ लक्ष

४)सणसवाडी येथील शाळा दुरुस्ती १२.७९ लक्ष

५) दरेकरवाडी येथील मुख्य चौक सभामंडप करणे ८ लक्ष

६) वढु बुद्रुक येथील चाफावाडा वस्ती पाण्याची टाकी ते ओढा रस्ता करणे ७ लक्ष

असा एकूण ७२लाख ५५ हजारांच्या निधीच्या विकासकामांची मंजुरी मिळाली आहे. सणसवाडी , दरेकरवाडी , वढु बुद्रुक येथील विविध विकासकामांसाठी आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित दरेकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांच्या रस्ता , शाळा इमारत दुरुस्ती, सभामंडप कामे पूर्ण होणार असल्याने सणसवाडी पंचक्रोशीतील विकास हा सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेणारा असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करत असून समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करत आहे. जनतेच्या सोयी सुविधा व मूलभूत विकास कामे करणे ही आमदार अशोक पवार यांची शिकवण आहे .– पंडित दरेकर ,सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!