Friday, July 26, 2024
Homeइतरपुणेमार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेसद्वारे राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी

पुणेमार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेसद्वारे राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी

राज्य सरकारकडून ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ या मोहिमेतून रेल्वेबोगींवर करण्यात आलेली शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी

प्रतिनिधी – प्रियांका ढम पुणे

पुणे – दिनांक १० फेब्रुवारी

आघाडी शासनाकडून राज्यात विविध लोकहिताच्या योजना राबविण्यात येत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विविध माध्यमांद्वारे या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात. प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ या मोहिमेतून रेल्वेबोगींवर शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुण्यामार्गे धावणाऱी कोल्हापूर-गोंदिया या लांबपल्ल्याची महाराष्ट्र एक्सप्रेस, लातूर एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेसचा यात समावेश आहे.गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने राबवलेल्या व प्रगतीपथावर असलेल्या जलद वाहतुकीसाठी सागरी मार्ग, समृध्दी महामार्ग आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प, कुटूंबातील महिलांच्या नावावर घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्याची सूट, क्षमता आणि कौशल्य वृध्दीसाठी शिक्षण-प्रशिक्षण आदींसह आरोग्य, शेती, क्रीडा आदी विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत या उपक्रमाद्वारे पोहोचणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करत आहे. आतापर्यंत केवळ खासगी आणि केंद्र शासनाच्या उपक्रमांद्वारे वापरल्या जाणाऱ्या रेल्वे डब्यांवर जाहिराती ‘रॅप’ करण्याची संकल्पना राज्य शासनानेही अवलंबली असून पाच एक्सप्रेस रेल्वेगाड्यांवर शासनाच्या कल्याणकारी कामाच्या जाहिराती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

अन्य दोन गाड्यांचा समावेश

दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आणि मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस या दोन गाड्यांवरही या जाहिरात संकल्पना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. विविध क्षेत्रात राज्य शासनाचे विविध उपक्रम सुरू आहेत. दोन वर्षात राज्य सरकारने अनेकविध विकासकामे केली आहेत. त्यांची माहिती या एक्स्प्रेसवर प्रदर्शित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी ७ फेब्रुवारीपासून या

अभियानाला सुरुवात झाली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!