कराड हेमंत पाटील
सातारा – पी डी पाटील सहकारी बँक लि.कराड ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री,आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत व बँकेचे चेअरमन अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्व सौ वेणूताई चव्हाण स्मारक, कराड येथे खेळीमेळीच्या वातावरणात आज संपन्न झाली.यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.याप्रसंगी बँकेचे व्हॉईस चेअरमन मुकुंद कुलकर्णी, प्रकाश पाटील, सागर पाटील,माजी नगरसेवक सौरभ अशोकराव , दाजी पवार,बाळासाहेब सूर्यवंशी, प्रशांत यादव, संचालक हेमंत ठक्कर, नंदकुमार बटाणे, ॲड.चंद्रकांत कदम, बाळासाहेब जगदाळे, उमेश कदम, रामचंद्र पवार, शामराव मुळे, शिरीष वांकर,संभाजी पिसाळ,मज्जीद आंबेकरी, सुधाकर रामुगडे, डॉ.सौ. अंजली शाह,रंजना पाटील, सी ए अनिल कुलकर्णी, सी ए आनंद चांडक ,ऍड प्रताप पाटील, अमोल सूर्यवंशी, राघवेंद्र कोल्हापुरे, गोपाळ साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी नजमुद्दीन मोमीन व सभासद उपस्थित होते.