Wednesday, October 9, 2024
Homeताज्या बातम्यापिंपळे जगताप येथील धर्मनाथ देवराई वनिकरणासाठी एक पाण्याचे आवर्तन सोडणार -...

पिंपळे जगताप येथील धर्मनाथ देवराई वनिकरणासाठी एक पाण्याचे आवर्तन सोडणार – आमदार अशोक पवार

पिंपळे जगताप येथे साडे तीन हजार वृक्षारोपण

कोरेगाव भीमा – पिंपळे जगताप ( ता.शिरूर) येथे मागील तीन वर्षांपासून सत्तावीस हजारांपेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात आले असून यामध्ये सर्वांचा मोठा सहभाग असून येथील वनराई सुस्थित आहे आपल्या मागणीनुसार ज्यावेळी पाणी येईल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला एक आवर्तन मिळेल असे आश्वासन दिले.

       काही वर्षातच हा मानवनिर्मित प्रकल्प  देशात व जगात दिसून येईल येथील प्रकल्प निश्चितच आगळा वेगळा दिसून येईल. येथील झाडे मोठी होतील फुलेल बहरेल त्यावेळी येथील निसर्ग सौंदर्य काही अगले वेगळे असेल. जगात  मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे पण त्याप्रमाणे झाडे लावण्यात येत नाही. यावेळी आमदार पवार यांनी वृक्षारोपण कार्याचे कौतुक करत नागरिकांना गणेशोस्तवाच्या शुभेच्छा दिल्या.

     पिंपळे जगताप ( ता.शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते साडे तीन हजार वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार अशोकंपावर यांचे बैलगाडीतून स्वागत करण्यात आले तर विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण केले. यावेळी आमदार अशोक पवार यांनी श्रमदान करत वृक्षारोपण केले.

     सामाजिक व पर्यावरणाच्या स्तुत्य उपक्रमात धर्मनाथ देवराई वनीकरण प्रकल्पाचे धर्मराज बोत्रे ,पिंपळे जगताप ग्रामस्थ, नॅशनल ऍग्रो फाउंडेशन कंपनी,पी. एन वाय  कंपनी,आय. एच. व्ही.कंपनी या सर्व कंपन्यांचे २५००   कर्मचारी  व वेगवेगळ्या कॉलेजच्या ३०० विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी ३५०० रोपांचे वृक्षारोपण केले.

       पिंपळे जगताप येथील धर्मनाथ देवराई वनीकरण प्रकल्पाचे धर्मराज बोत्रे, चंद्रकांत वारघडे व सहकारी,समाजसेवक यांनी एक कोटी वृक्षारोपणाचा संकल्प केला असून मोठ्या प्रमाणावर तो पूर्ण करण्यासाठी भरघोस सर्वतोपरी योगदान देत आहेत. साडे तीन हजार रोपांचे वृक्षारोपण करण्याचे महत्वपूर्ण योगदान  व समन्वय डॉ विद्या दुराई,उद्योजक जनार्दन कर्णवार , धर्मराज बोत्रे व सहकाऱ्यांनी तसेच सर्व कंपनी व्यवस्थापन, कर्मचारी यांनी केले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर धर्मराज बोत्रे, माजी सरपंच निलेश जगताप, गणेश शेळके, शिवाजी जगताप ,विशाल तांबे ,अरविंद तांबे, कुशाल बेंडभर, मारूती तांबे व मान्यवर उपस्थित.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!