कोरेगाव भिमा – पिंपळे जगताप (ता.शिरूर) ग्राम पंचायतीचे मेटा मार्फेसिस प्रा. लि. कंपनीने गट क्रमांक ५७ मधील मिळकत क्रमांक ११५४ ची सन २०२३-२४ अखेर थकीत रक्कम ७४,१२, ७३७ रुपयंची थकीत असून ग्राम पंचायतीच्या पत्रव्यवहाराला कोणताही प्रतिसाद न देता अक्षरशः केराची टोपली दाखवण्याचे काम कंपनी प्रशासन करत असल्याचे उपसरपंच रेश्मा नितीन कुसेकर यांनी सांगितले.
पिंपळे जगताप ग्राम पंचायतीचा दर वर्षीचा एकूण वसूल ५८ लाख १० हजार ९६५ इतका वसूल असून मेटा फोर्सेस प्रा. लि. कंपनीने ७४,१२,७३७ थकवले असून ग्राम पंचायतीच्या उत्पन्ना पेक्षा कंपनीचा थकीत जास्त रकमेचा असून इतर कंपन्यांचा वेळेत कर भरण्यात येत असून निव्वळ एका मेटा मार्फेसिस इंजिटेक इंडिया प्रा.लि. कंपनीने ग्राम पंचायतीच्या उत्पन्नापेक्षा जास्त कर थकविल्याने गावची विकास कामे करायची तरी कशी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.संबधित कंपनीच्या कराबाबत ग्राम सभा व मासिक सभेमध्ये चर्चा करण्यात आली आहे.
मेटा मार्फेसिस प्रा.लि. कंपनीची ग्राम पंचायत दप्तरी नोंद नसून संबधित थकबाकी बाबत कोणताही पत्रव्यवहार अथवा मेल मिळाला नाही. गावातील कामे मागतात तसेच ग्राम पंचायत दप्तरी कंपनीची नोंद करण्यात यावी यासाठी २०२० पासून नोंदीसाठी अर्ज दिला असून नोंद करण्यात आली नाही. अशी माहिती कंपनीचे एच आर सतीश खंडाळे यांनी दिली.
इनोव्हेटिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा थकीत कर असून ही कंपनी सध्या मेटा मार्फेसिस इंजिटेक इंडिया प्रा.लि.कंपनी नावाने सुरू असून सदर कंपनीने तातडीने कर भरावा अशी मागणी उपसरपंच रेश्मा नितीन कुसेकर यांनी केली आहे.