Saturday, July 27, 2024
Homeक्राइमपालखी सोहळ्यात वारकऱ्यांचे सोने,पाकीट, पैसे चोरणाऱ्या चोरट्यांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या चोरांमध्ये...

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचे सोने,पाकीट, पैसे चोरणाऱ्या चोरट्यांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या चोरांमध्ये ४२ महिलांचा समावेश.

पुणे पोलिसांनी एकुण १२० संशयितांची धरपकड करत जबरी चोरी करतांना एकुण ७ आरोपींना रंगेहात पकडुन ५ जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे – श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने सुरू असून यामध्ये सुमारे दहा ते बारा लाख वारकरी भाविक दोन्ही पालख्यांमध्ये सामील झाले आहेत. या पालखी सोहळा वाटचाली दरम्यान वारकरी व भाविक भक्तांच्या सोन्याची दागिने, पैसे,पाकिटे व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या चोरांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एकुण १२० संशयितांची धरपकड करत जबरी चोरी करतांना एकुण ७ आरोपींना रंगेहात पकडुन ५ जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी बंदोबस्त दरम्यान १२ महिला व १० पुरूष यांची धरपकड करण्यात आली असुन इसम नामे १) राजेंद्र रामु माने, (वय ३४ वर्षे), रा. पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, २) पांडुरंग सोन्याबापू मासळकर, (वय ४६ वर्षे), रा. पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर यांना वारकऱ्यांचे साहित्य व चीजवस्तू चोरतांना ताब्यात घेवुन त्यांचेविरूध्द सासवड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्त दरम्यान ६८ पुरूष व ३० महिला यांची धरपकड करण्यात आली असुन इसम नामे १) राजेंद्र सिंग बहालसिंग, (वय ४८ वर्षे), रा. सिंकदरपुर पालबल हरियाणा, यास महिला वारकरी यांचे गळयातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावुन चोरी करून पळुन जात असताना त्यास ताब्यात घेतले असून यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २) सुनिल नामदेव काळे, (वय ३८ वर्षे), रा. जोगेश्वरी मुंबई, ३) रिजवान उर्फ सद्दाम कुरेशी, रा. वार्ड- २ श्रीरामपुर, अहमदनगर यांना वारकरी हे श्री. संत तुकाराम महाराज पालखीच्या दर्शनाकरीता येत असताना पुलाखालील बोगद्यात वारकरी यांचे खिशातुन जबरदस्तीने पैसे काढुन घेतांना रंगेहात पकडुन ताब्यात घेवुन यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४) कैलास संजय पवार, रा. साने चौक भीमशक्तीनगर चिखली पुणे मूळ रा. जामखेड गोडेगाव यास पालखीमध्ये दर्शनासाठी आलेले साडेतीन व चार वर्षांच्या मुलींच्या गळयातील सोन्याचे बदाम हिसका मारुन बळजबरीने तोडुन चोरी केल्याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन ५) संकेत राहुल अब्दुले, रा. बोरोबा टॉकीज जामखेड, अहमदनगर यास वारकरी यांचे पॅन्टच्या पाठीमागील उजव्या बाजच्या खिशात हात घालुन बळजबरीने पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम काढुन घेत असताना रंगे हात पकडले असून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपींकडुन एकुण १६ ग्रॅम वजनाचे सहासष्ट हजार रूपये किंमतीचे सोने व रोख रक्कम ६,७५०/- रूपये, असा एकुण बाहत्तर हजार सातशे पन्नास रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेकडुन कारवाई करतांना आषाढी वारी २०२३ दरम्यान गुन्हयांना प्रतिबंध केला असुन घडलेल्या गुन्हयातील गुन्हेगारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे.

पालखी उत्सव दरम्यान यापुढेही वारकरी व भाविकांच्या लुटमार होवु नये व त्यांना त्रास होवु नये तसेच त्यांचे अंगावरील दाग दागिने याबाबत विशेष दक्षता घेण्याबाबत तसेच वारकऱ्यांची व त्यांचे मालमत्तेची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखा, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभागआनंद भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी खालील प्रमाणे उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!