Saturday, May 25, 2024
Homeसाहित्य/सामाजिकधक्कादायक - पाचगणी टेबल लॅन्ड पठारावर वीज कोसळून तीन घोड्यांचा...

धक्कादायक – पाचगणी टेबल लॅन्ड पठारावर वीज कोसळून तीन घोड्यांचा दुर्दैवी मृत्यू

प्रशासनाकडून मदतीची अपेक्षाहातावर पोट असणाऱ्या गरजुंच्या मदतीसाठी प्रशासन धाव घेईल का??

ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिक हवालदिल

प्रतिनिधी प्रतीक मिसाळ

पाचगणी, दि. २० : विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पाऊस चालू झाला असता झाडाखाली स्टॉल च्या समोर व आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवार (दि.२०) पाचगणी टेबल लँन्ड पठारावर दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने थोडक्यात बचावले.

पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काही घोडे व्यावसायिकांनी आपली घोडी झाडालगत असणाऱ्या स्टॉल समोर व आडोश्याला बांधून सदर व्यावसायिक दुसऱ्या स्टॉलमध्ये थांबले. यावेळी वीज कोसळल्याने तीन घोडी जागीच ठार झाली.

ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.या घटनेत शंकर गायकवाड, संभाजी दामगुडे, सुनील कांबळे यांचे अंदाजे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. तरी या घोडे व्यवसायिकांना प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!