Friday, June 21, 2024
Homeस्थानिक वार्तापाईप बँडचे शानदार संचलन

पाईप बँडचे शानदार संचलन

अमृत महोत्सवानिमित्त दिन अण्णासाहेब विद्यालयात साजरा

हवेली प्रतिनिध सुनील थोरात

मांजरी बुद्रुक : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर पोलीस दलाच्या वतीने पाईप बँडचे शानदार संचलन आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे तसेच पोलीस दलातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवकांनी या शानदार संचलनाचा आनंद घेतला. विद्यार्थी व प्राध्यापकवर्गाने याप्रसंगी तिरंगा धारण करून या सोहळ्याची शान वाढविली. याप्रसंगी संचलन करणाऱ्या पाईप बँडचे सर्वांनी मनःपूर्वक स्वागत केले. पोलीस पाईप बँडच्या या पथकाचे प्रशिक्षक असई. एम. एन. उगलमुगले, असई. के. पी. कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातील जवानांनी हे संचलन केले. राष्ट्रीय स्तरावर सन २०१६ पासून या बँड पथकाने सलग चार वर्ष सुवर्णपदकाचा मान पटकाविलेला आहे. ‘ए मेरे वतन के लोगो’ ‘हम होंगे कामयाब यांसारख्या देशभक्तीपर गीतांचे सूर याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रांगणात निनादले

यावेळी उपप्राचार्य अनिल जगताप, उपप्राचार्य प्रा. एम. जे. खैरे, कला शाखा समन्वयक डॉ. प्रवीण ससाणे, धनंजय बागडे, डॉ.जी.पी. सातव, डॉ. शुभांगी औटी, डॉ. सविता कुलकर्णी, प्रा. नितीन लगड, प्रा.अनिता गाडेकर, प्रा. संजीव पवार, हडपसर पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. चेतन थोरबोले, ए.पी.आय. सचिन थोरात, पोलीस मित्र दिनेश शिंदे, समीर पांडूळे, अमोल मक्राज, सचिन शिंदे, खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!