मिलिंदा पवार खटाव सातारा
पृथ्वीवर आसनाऱ्या बऱ्याच दुर्मिळ वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत . या जटिल गंभीर समस्येचा विचार करून भविष्यात आपल्याला व आपल्या भावी पिढीला दुर्मिळ वनऔषधी सुगंधि आयुर्वेदिक गुणधर्म वनस्पतींचे माहिती व त्याचा उपयोग व्हावा म्हणून पर्यावरणप्रेमी रोहित बनसोडे , रक्षीता बनसोडे सातारा ( शालेय विद्यार्थी) आणि मार्स एम आय टी.पुणे संचलित एम् आय टी इंजिनियरींग काॅलेज आळंदी पुणे येथील शाळेच्या राखीव आवारात १०० प्रकारच्या देशी वन औषधी सुगंधि आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पर्यावरण प्रेमी रोहित बनसोडे यांनी सांगितले कीसध्याच्या काळात दुर्मिळ वनस्पतींचे आस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हि परस्थिती लक्षात घेऊन आम्ही दुर्मिळ वनस्पती चे जतन व माहिती पुढच्या पिढीला होण्यासाठी असे प्रोजेक्ट महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत शिक्षक विध्यार्थी लोकसभागातुन राबविण्याचा आमचा माणस आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवायोजना आणि कार्यशाळा व ऍग्रोटेक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने संचालक डॉ महेश गौडर सर,डॉ.प्रा.माया चरडे , डॉ प्रफुल्ल हत्ते, प्रा. हुसेन शेख, इंजि.श्री नामदेव राशिनकर,उपस्थित होते.