Friday, June 21, 2024
Homeस्थानिक वार्तापर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी प्रा. जे. के. पटेल

पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी प्रा. जे. के. पटेल

कुलदीप मोहिते

कराड – दिनांक २७ सप्टेंबर

“पर्यटन हे अर्थव्यवस्थेतील महत्वाचे क्षेत्र आहे. पर्यटनामुळे राष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. पर्यटनामुळे विदेशी चलन प्राप्त होते त्यामुळे देशाच्या गंगाजळीत वाढ होते. तसेच ज्ञान आणि तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण होते. पर्यटनामुळे भाषेचा विकास होतो आणि पर्यटनामुळे देशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.” असे प्रतिपादन प्रा. जे. के. पटेल यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव हे होते.


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी , “जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ह्या पर्यटनावर अवलंबून आहेत. पर्यटनामुळे राष्ट्राराष्ट्रातील संबंध सलोख्याचे होतात. व व्यापारात वाढ होते. त्यामुळे सर्वच राष्ट्रांचा विकास होण्यास मदत होते. विशेषता: ग्रामीण भागाच्या विकासात पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी असे दिन साजरे करून विद्यार्थ्यामध्ये त्याविषयी जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमात बी. ए. भाग दोन मधील विद्यार्थिनी कु. वैष्णवी मोरे आणि कु. वृषाली कांबळे यांनी तयार केलेल्या “अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्व” या विषयावरील भित्तीपत्रकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए. बी. मुळीक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार एस. डी. डांगे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सौ. एस. आर. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास प्राध्यापक प्राध्यापिका, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!