Thursday, July 18, 2024
Homeक्राइमपर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून लुटणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी अवघ्या तिन तासात आवळल्या...

पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून लुटणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी अवघ्या तिन तासात आवळल्या मुसक्या

पुणे – लोणावळा परीसरात जुने पुणे मुंबई हायवे रोडवरील तसेच मळवली, कार्ला भाजे व मनशक्ती केंद्र वरसोली परीसरात पर्यटनासाठी आलेल्या व परीसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान बॅगांमधील रोख रक्कम, मोबाईल इतर मौल्यवान वस्तु लुटणाऱ्या आरोपींना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अवघ्या तीन तासात आरोपील पकडल्याने लोणावळा पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.
मनशक्ती केंद्र वरसोली येथे घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली असता सदर फुटेजमध्ये इनोव्हा सदृष्य कारमधील ३० ते ३५ वयाचा अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम हा चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना आढळल्याने पोलीसांनी सदर संशयीत इनोव्हा कारचा वरसोली, कार्ला, मळवली, भाजे व लोहगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काळ्या काचा असणारी टोयोटा कंपनीची इनोव्हा कार नं. जी जे ०६ एफ सी ३८०६ ही मौजे भाजे धबधबा नं. २ परीसरात संशयीत रित्या फिरत असताना मिळुन आल्याने पोलीसांनी कारचालकाकडे विचारपूस केली असता  अखिल सलीम व्होरा वय ३२ वर्षे रा. गुजरात असे सांगीतले. पोलीसांनी सदर कारची झडती घेतली असता सदर चालकाकडे इनोव्हा गाडीत सीमकार्ड नसलेले एकुण ६ मोबाईल, तसेच ५ पर्स, २ बॅगा, २ पॉवर बँक, २ घड्याळे, २२९००/- रोख रक्कम व इनोव्हा कार असा एकुण १२,११,१००/- रुपये असा असा मुद्देमाल मिळाला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तीक, वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने , पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहाय्यक फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस हवालदार बाळकृष्ण भोईर, पोलीस हवालदार विजयभाऊ मुंढे यांचे पथकाने केलेली असुन गुन्ह्यांचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!