Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्यापराक्रम, त्याग, शौर्य,बुद्धिमत्ता , बलिदान व वीरांचे विर म्हणजे महावीर छञपती...

पराक्रम, त्याग, शौर्य,बुद्धिमत्ता , बलिदान व वीरांचे विर म्हणजे महावीर छञपती संभाजी महाराज – संदीप मोहिते

श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी ” महावीर छञपती संभाजी ” या आगामी चित्रपटाची स्क्रिप्ट ( पटकथा) समर्पित

कोरेगाव भीमा – दिनांक २२ एप्रिल
पराक्रम, त्याग, शौर्य,बुद्धिमत्ता , बलिदान व वीरांचे विर म्हणजे महावीर छञपती संभाजी महाराज आहेत. श्री हनुमान हे आहेत महावीर आहेत तसेच छञपती संभाजी महाराजांचा इतिहास हा चिरंजीवी व चिरंतन व वीरांचे वीर म्हणजे महावीर असल्याने चित्रपटाचे नाव “महावीर छञपती संभाजी” असे ठेवले असल्याचे चित्रपट निर्माते व ऐतिहासिक मोहिते घराण्याचे संदीप मोहिते यांनी सांगितल

यापुढे बोलताना मोहिते ,यांनी छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्र भूमीतील कणाकणात व मराठी माणसाच्या मनामनात कोरलेला आहे. त्यांचा पराक्रम, त्याग, शौर्य,बुद्धिमत्ता , बलिदान व प्रजाहितदक्षता संपूर्ण जगात व भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी हा चित्रपट निर्माण करत असून ” महावीर छत्रपती संभाजी ” चित्रपट व्यावसायिक नफा मिळवणारा चित्रपट नाही तर हा चित्रपट म्हणजे मोहिते घराण्याचा छत्रपतींच्या प्रती असलेल्या निष्ठेचा व भक्तीचा समर्पण भाव आहे अशा भावना व्यक्त केल्या यावेळी उपस्थित शंभू भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे चरणी नित्यपुजेच्या वेळी आगामी चित्रपट “महावीर छञपती संभाजी” पटकथा ( स्क्रिप्ट) चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील,नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा रामदास दरेकर , माजी सरपंच अंकुश शिवले यांच्या हस्तेअर्पण करण्यात आली.

यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा भावी पुढील प्रेरणा देणारा अनमोल मार्गदर्शन करणारा आहे. “महावीर छञपती संभाजी” चित्रपटाला महाराष्ट्रात भरभरुन प्रतिसाद मिळेल अशा शुभेच्छा सणसवाडीच्या नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी दिल्या.

श्री क्षेत्र वढू बुद्रुक ग्राम पंचायतीच्या वतीने चित्रपट निर्मातेचित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील ,शेखर मोहिते पाटील,सौजन्य निकम,धर्मेंद्र बोरा, केतन भोसले सौ. वैशाली ताई संदीप मोहिते,कु, शिवनेरी शेखर मोहिते, श्रध्दा शिंदे,शिवशंकर स्वामी, ,राजेंद्र मोहिते पाटिल सर, प्रतिक मोहिते ,रणजित निकम, सूरज भिसे, श्रीहरी काळे, गणेश फणसे, रणजित ढगे, राजेंद्र बेंद्रे, श्रध्दा शिंदे, तुषार शेलार ,मयूर कुपडे ,प्रसाद भारदे,राहुल नेवसे , वीरेंद्र मोहिते,संदेश मोहिते, शुभम मोहिते,सौरभ मोहिते व प्रोडक्शन टीमचे सहर्ष स्वागत करण्यात येऊन त्यांना धर्मवीर छञपती संभाजी महाराजांची प्रतिमा , शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सणसवाडीच्या नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, वढू बुद्रुकचे  माजी सरपंच अंकुश शिवले, उद्योजक रामदास दरेकर, उपसरपंच राहुल ओव्हाळ, ग्राम पंचायत सदस्य लाला तांबे,पांडुरंग आरगडे, हरिभाऊ शिवले व शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!