श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी ” महावीर छञपती संभाजी ” या आगामी चित्रपटाची स्क्रिप्ट ( पटकथा) समर्पित
श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे चरणी नित्यपुजेच्या वेळी आगामी चित्रपट “महावीर छञपती संभाजी” पटकथा ( स्क्रिप्ट) चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील,नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा रामदास दरेकर , माजी सरपंच अंकुश शिवले यांच्या हस्तेअर्पण करण्यात आली.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक ग्राम पंचायतीच्या वतीने चित्रपट निर्मातेचित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील ,शेखर मोहिते पाटील,सौजन्य निकम,धर्मेंद्र बोरा, केतन भोसले सौ. वैशाली ताई संदीप मोहिते,कु, शिवनेरी शेखर मोहिते, श्रध्दा शिंदे,शिवशंकर स्वामी, ,राजेंद्र मोहिते पाटिल सर, प्रतिक मोहिते ,रणजित निकम, सूरज भिसे, श्रीहरी काळे, गणेश फणसे, रणजित ढगे, राजेंद्र बेंद्रे, श्रध्दा शिंदे, तुषार शेलार ,मयूर कुपडे ,प्रसाद भारदे,राहुल नेवसे , वीरेंद्र मोहिते,संदेश मोहिते, शुभम मोहिते,सौरभ मोहिते व प्रोडक्शन टीमचे सहर्ष स्वागत करण्यात येऊन त्यांना धर्मवीर छञपती संभाजी महाराजांची प्रतिमा , शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी सणसवाडीच्या नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, वढू बुद्रुकचे माजी सरपंच अंकुश शिवले, उद्योजक रामदास दरेकर, उपसरपंच राहुल ओव्हाळ, ग्राम पंचायत सदस्य लाला तांबे,पांडुरंग आरगडे, हरिभाऊ शिवले व शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.