Sunday, October 27, 2024
Homeक्राइमपन्नास हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठ्यासह मदतनीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पन्नास हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठ्यासह मदतनीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

शेत जमीन खरेदीची नोंद आणि मिळकतीचे हक्क सोड नोंद करण्यासाठी ५० हजार रुपये लाच मागणाऱ्या महिला तलाठ्यासह लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) त्यांच्या खासगी मदतनीसाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले.

  अहमदनगर –  शेंडी (ता.नगर) सोमवार दि.११ डिसेंबर रोजी  छत्रपती संभाजीनगर रोडवरील भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर येथे करण्यात आली.तलाठी निकिता जितेंद्र शिरसाठ (वय-४६), खासगी मदतनीस संकेत रणजीत ससाणे (वय २६ )रा. निर्मल नगर, तपोवन रोड, अहमदनगर) असेल लाच स्वीकारताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत नगर तालुक्यातील शेंडी येथील ३५ वर्षीय व्यक्तीने अहमदनगर एसीबीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारदार यांची मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी तलाठी निकीता शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी सोमवारी अहमदनगर एसीबीकडे तक्रार केली होती.

प्राप्त झालेल्या तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी निकिता शिरसाठ यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांचेकडे जमिनीच्या खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी ५० हजार रुपये लाच मागणी करून ती लाच रक्कम त्यांचे खाजगी मदतनीस संकेत ससाणे यांच्याकडे देण्यास सांगितले.

त्यानुसार एसबीच्या पथकाने सोमवारी छत्रपती संभाजी नगर रोड वरील भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर येथे सापळा लावला.आरोपी संकेत ससाणे याने तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष ५० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांनारंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन  येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ,अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि नाशिक माधव रेड्डी , पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे , सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार राधा खेमनर, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, चालक हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!