Wednesday, September 11, 2024
Homeताज्या बातम्यापत्रकार लोकशाहीचा आधारस्तंभ, समाजाचा आरसा व सामाजिक जाणीव असणारा घटक...

पत्रकार लोकशाहीचा आधारस्तंभ, समाजाचा आरसा व सामाजिक जाणीव असणारा घटक – आदर्श सरपंच रमेश गडदे

आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या स्वखर्चातून पत्रकारांची दिवाळी गोड करत काढण्यात येणार विमा कवच

शिक्रापूर – शिक्रापूर (ता.शिरूर) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ व समाजाचा आरसा असणारा व सामाजिक ऋणानुबंध जपणारा महत्वपूर्ण घटक असून हा घटक समाजाला दिशा देण्याचे काम करतो, अनेक गोष्टींना समाजासमोर मांडण्याचे काम करतो.समाजाच्या अडचणी मांडणारा पत्रकार समाजाला दिशा देण्याचे काम करतात असल्याने त्यांचे समाजात मोलाचे व अद्वितीय स्थान असल्याचे मत व्यक्त करत शिक्रापूर हद्दीतील पत्रकारांना स्वखर्चातून विमा कवच देणार असल्याचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.


शिक्रापूर हाद्दीतील सर्व पञकार बांधवांना विमा कवच स्वखर्चाने देणार असल्याचे शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले. यावेळी दिवाळी निमित्त शिक्रापूर येथील सर्व पञकार बांधवाना दिवाळी निमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. सरपंच पदाचा भार घेतल्यानंतर सलग तीन वर्ष हा कार्यक्रम राबवतात. पत्रकार बांधव हे अहोराञ समाजासाठी काम करत असतात. काम करत त्याना अंनत अडचणीशी सामना करावा लांगतो. त्याचा विचार करुन त्यांना विमा कवच द्यावा हि संकल्पना सुचली असल्याचे गडदे यांनी सांगितले.
समाजात विविध बातम्या करण्यासाठी फिरणाऱ्या पत्रकारांना सुरक्षितता मिळावी व दुर्दैवाने काही अपघात झाल्यास त्यांची उपचाराची व्यवस्था व्हावी तसेच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक दुर्दशा होऊ नये यासाठी आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या माध्यमातून पत्रकारांना विमा कवच देण्यात येणार असल्याचे सांगितले.

शिक्रापूर ग्रामनगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी वैक्तिक स्वरूपात पत्रकारांना मिठाई वाटप करत व विमा कवच देण्याचे जाहीर करताच उपस्थित पत्रकारांनी आदर्श सरपंच रमेश गडदे यांचे आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नागनाथ शिंगाडे, प्रवीण जगताप सर यांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती सरपंच पदावर बसल्यावर विधायक विकासाची कामे व सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवत ,सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करण्याचे व गावच्या विकासाचा आलेख उंचावत ठेवत सलग तीन वर्षे आदर्श सरपंच पुरस्कार मिळवणारे एकमेव आदर्श सरपंच रमेश गडदे असून त्यांच्या कामाची पद्धती व माणुसकीची बनाढलकी जपणारे खरोखर आदर्श व्यक्तिमत्व आहे.त्यांच्याकडे समस्या आली की तिची निराकरण तातडीने करतात हा आमचा अनुभव असल्याचे सांगत सरपंच रमेश गडदे यांच्या कार्याचे कौतुक करत अभिमान असल्याचे सांगितले.

पञकार बांधवाच्या वतीने नागनाथ शिंगाडे, जगताप सर, उदयकांत ब्राम्हणे, संतोष काळे आदींनी मनोगते मांडली. कार्यक्रमाचे अभार ञिनयन कळमकर यांनी केले.ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला ३० पञकार उपस्थित होते. यावेळी ग्राम पंचायत सदस्य ञिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, जेष्ठ पञकार नागनाथ शिंगाडे , जगताप सर, प्रा.देशमुख सर , उद्यकांत ब्राम्हणे, नंदकुमार शहाणे, शेरखान शेख, धनश्याम तोडकर, निलेश जगताप, नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य पञकार राजाराम गायकवाड, संतोष काळे, ग्रामपंचायत कर्मचारी विलास पवार, गणेश गायकवाड अन्य उपस्थित होते.


पत्रकारांवर एकाची बातमी करताना चार जणांचा रोष येत असतो पण सर्वसामान्य माणसाची वेदना ,व्यथा मांडत न्याय देण्याचे प्रामाणिक काम पत्रकार करत असतात. प्रत्येक कार्यकर्त्याला बातमी आल्यावर काम करण्यास प्रेरणा मिळते आत्तापर्यंत सर्व पत्रकारांनी बहुमूल्य साथ दिली , जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत सर्वांचा आदर सन्मान करण्यासह माणुसकीचे नाते जपत वाटचाल करणार असून पत्रकार व आमचे हे माणुसकीचे कुटुंब असल्याची भावना आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!