Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्यापत्रकार सुनिल पिंगळे "कार्यगौरव" पुरस्काराने सन्मानित

पत्रकार सुनिल पिंगळे “कार्यगौरव” पुरस्काराने सन्मानित

बारा वर्षेच्या निःपक्ष पत्रकारितेचा गौरव

कनेरसर (ता.खेड) भारतीय कामगार चळवळीचे जनक,रविवारच्या सुट्टीचे निर्माते, कनेरसर ता.खेड येथील थोर सुपुत्र रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे व पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामविकास प्रतिष्ठान, राजगुरुनगर या संस्थेच्या वतीने दोन्ही मान्यवरांचे ” कार्यपत्र प्रकाशन ” व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कार्य गौरव सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रम दरम्यान अनेक कर्तृत्ववान लोकांना सन्मानित करण्यात आले यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात गेले बारा वर्षे कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूर तालुका उपाध्यक्ष पत्रकार सुनिल पिंगळे यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “कार्यगौरव” पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सुनिल पिंगळे हे शिरूर तालुक्यातील एक निर्भय,निर्भीड पत्रकार म्हणून सुनिल पिंगळे यांची ख्याती आहे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, एक निर्भय पत्रकार, एक सर्पमित्र, अशी विविध प्रकारच्या भुमिकेमधुन सुनिल पिंगळे है निस्वार्थी पणानं काम करत आहेत या कार्याची दखल घेता अनेक वेळा सुनिल पिंगळे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

या दोन्ही सुपुत्रांच्या स्मृतिदिनानिमित्त उल्लेखनीय यशस्वी पत्रकारिता व पत्रकार क्षेत्रातील कार्य गौरव पुरस्काराने सुनिल पिंगळे यांना दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव , सोनावणे , भाजपचे विधानभवन सचिव राजेंद्र खंडीझोड, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी-लेखक अशोक टाव्हरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्हे, शाल, श्रीफळ, व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अशोक टाव्हरे यांनी केले, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनावणे अध्यक्षस्थानी होते,प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे विधानभवन सचिव राजेंद्र खंडीझोड, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,बाबाजी काळे, कार्यालय सचिव राजेंद्र खंडीझोड, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वारघडे,दूरदर्शन सह्याद्रीच्या प्रसिद्ध निवेदिका पुजा थिगळे, दिलीप मेदगे, रावबहाद्दूर लोखंडे यांचे पणतू गोपीनाथ लोखंडे, कनेरसर सोसायटी चेअरमन मच्छिंद्र दौंडकर, खेड ता.भाजप उपाध्यक्ष दिलीप माशेरे,बहुळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पंकज हरगुडे तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले तर आभार शिवाजी ताम्हाणे व्यक्त केले

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!