हेमंत पाटील सातारा
सातारा – सातारा जिल्ह्यातील तरुण व धडाडीचे पत्रकार मिलिंद लोहार यांना यावर्षीचा लोकशासन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२०- २०२१ हा सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे .पत्रकार मिलिंद लोहार हे सातारा जिल्ह्यातून काम करत असताना आपल्या बातम्यांच्या परखड व स्पष्ट रोखठोक बातम्यांनी प्रसिद्ध आहेत समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट बातम्या समाजासमोर मांडणे याची दखल घेत लोकशासन न्यूज यांनी मिलिंद लोहार यांना पुरस्काराने सन्मानित केले प्राईम एफ एक्स आणि क्रिएटर ट्रेडर्स सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम कास पठार येथील हेरिटेज वाडी या ठिकाणी संपन्न झाला
मिलिंद लोहार यांनी सांगितले की दैनिकाचे माध्यमातून अनेक एमआयडीसीतील समस्या मांडल्या होत्या मात्र काही काळ थोडा थांबलो होतो त्यानंतर पाठीमागील लॉकडाऊन मध्ये पत्रकारतेला पुन्हा सुरुवात केली संवाद मराठी लाईव्ह महाराष्ट्र मिरर लोकशासन न्यूज अशा वेगवेगळ्या चॅनेल्स मधून काम करत असताना वेगवेगळे प्रसंग झाले त्यानंतर मी सॅटेलाईट चॅनल न्यूज वन इंडिया ला जॉईन झालो व कामाची सुरुवात पुन्हा सुरू केली लोकशासन न्यूज ने दिलेली संधी खूप मोलाची होती आणि ती मी पार पाडत आहे.
याप्रसंगी न्यूज वन इंडियाचे निवासी संपादक आनंद गायकवाड लोकशासन न्यूज चे कार्यकारी संपादक मिलिंद लोहार पश्चिम महाराष्ट्र प्रमुख जय कराडे संचालक अजय कल्याने एम आय टी कॉलेज पुणे येथील जर्नालिझम चे शिक्षण देणारे अनुप ढम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लोकशासन चे सर्व जिल्हा प्रतिनिधी सत्यमेव जयते न्यूज चॅनेल चे संपादक संतोष कांबळे प्राईम एफ एक्स च्या ओनर रूपाली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते