Thursday, June 20, 2024
Homeक्राइमपतीच्या अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने गळफास घेत संपवले जीवन...अडीच वर्षांची चिमुकली...

पतीच्या अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने गळफास घेत संपवले जीवन…अडीच वर्षांची चिमुकली झाली पोरकी

मुलीच्या हातातील दूध संपण्याआधीच जीवन संपविले

पतीचे अपघातात निधन झाल्याचं ऐकताच धक्का बसलेल्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. नांदेडच्या नायगाव तालुक्यात यामुळे खळबळ उडाली आहे. स्नेहा बेंद्रीकर असं आत्महत्या केलेल्या पत्नीचं नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री बेंद्री (ता.नायगाव) येथे घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

बेंद्री येथील अरुण बाबुराव बेंद्रीकर हे विष्णुपुरी (नांदेड ) येथील महावितरण कार्यालयात नोकरीला होते. काम संपल्यावर शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीने आपल्या गावी बेंद्रीकडे परतत होते. गावाजवळ मांजरम कॉर्नर येथे त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात अरुण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने नांदेडला नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पतीच्या अपघाताचे वृत्त कळताच अरुण यांची पत्नी स्नेहा कुटुंबियांसह पतीला भेटण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयात आली होती. अरुण यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांना सांगण्यात आले. नातेवाईकांनी त्यांची समजूत काढत त्यांना बेंद्री येथील घरी पाठवले. मात्र, अपघातात पतीचा मृत्यू झाल्याची कुणकुण स्नेहा यांना लागली होती. हे दुःख त्यांना सहन झाले नाही. या घटनेच्या त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. या दुःखाच्या आणि निराशेच्या भरात त्यांनी मध्यरात्री घरातील एका खोलीत गळफास घेत जीवनयात्रा सपंवली.

स्नेहा यांनी आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. काही वेळापूर्वीच पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर काही तासातच पत्नीने गळफास घेत आयुष्य संपविले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण बेंद्री गावात शोककळा पसरली आहे. मृत अरुण व स्नेहा यांना अडीच  वर्षाचे एक अपत्य असून आई, वडील, दोन भाऊ असा परिवार त्यांच्या पश्चात आहे.

मुलीच्या हातातील दूध संपण्याआधीच जीवन संपविले – पतीच्या अपघाताची घटना समजतात कुटुंबीयांनी पत्नीसह नांदेड येथील शासकीय रुग्णालय गाठले. त्यावेळी डॉक्टरांनी अरुणचा मृत्यू झाल्याचे कळविले आणि सकाळी मृतदेह ताब्यात देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर अरुणच्या पत्नीला गावाकडे पाठवून दिले. रात्री दीडच्या सुमारास काही महिला तिच्यासोबत बसलेल्या होत्या. मात्र मुलीला पिण्यासाठी दूध देउन येते असे म्हणून ती एका खोलीमध्ये गेली. मुलीला पिण्यासाठी दूध दिले , मुलीचे दूध संपण्या अगोदरच तिने गळफास लावून आत्महत्या केली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!