Monday, June 17, 2024
Homeक्राइमनिवासी भागातील सिलिंडरची गोदामे त्वरित हटवण्यासाठी निवेदन

निवासी भागातील सिलिंडरची गोदामे त्वरित हटवण्यासाठी निवेदन

संभाजी ब्रिगेडचे अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन

पुणे – ताथवडे येथे जेएसपीएम कॉलेजच्या जवळील महामार्गाशेजारील मैदानात रविवारी टँकर मधून गॅस चोरी करतानाच मोठा स्फोट झाला. या स्फोटासारखे नऊ मोठे धमाके झाले. शेजारील इमारती हादरल्या. जेएसपीएम शाळेतील तीन बसेस जळून खाक झाल्या. गॅस चोरणारे चोरटे पळून गेले आणि आता पोलिस तपास करत आहेत.

शहरात अशा प्रकारे गॅस रिफिलिंग करताना थेरगाव, चिखली, चिंचवड, पिंपरी येथे दुर्घटना झाल्या. तीनही घटनांतून तीन कंत्राटी कामगार दगावल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.अशा परिस्थिती प्रशासनाला कुठलेच गांभीर्य दिसत नाही. तरी निवासी भागातील सिलिंडरची गोदामे बंद करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड येथील अप्पर तहसीलदारांना देण्यात आले.वाल्हेकरवाडी येथील स्वामी विवेकानंद कॉलनीत गेले तीन वर्षांपासून एक गॅसचे मोठे गोदाम भर वस्तीत आहे.

भरलेल्या सिलिंडर टाक्यांचे सात-आठ ट्रक तिथे उभे असतात. भरलेले कमर्शियल सिलिंडरसुध्दा मोठ मोठ्या टाक्यांतून या ठिकाणी ठेवले जातात. तिथेही गॅस रिफिलिंगचा ‘उद्योग’ सुध्दा रात्रभर चालतो.नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यावर पाहणीत तिथे गॅस रिफिलिंगची मशिनरीसुध्दा आढळून आल्या होत्या. निवासी भागातील हे बेकायदा गोदाम त्वरीत बंद करा म्हणून स्थानिक नागरिकांनी मिळून आपल्या महसुल खात्याला लेखी निवेदनही दिले होते.

गोदामे सील करा अन्यथा आंदोलन – तीन महिन्यांपूर्वी निवासी भागातील गॅस गोदामावर महसूल खात्यानेच फौजदारी गुन्हा दाखल केला होता मग आता इथे कारवाई का होत नाही. असा सवाल आता उपस्थित होत आहे. शहरातील निवासी भागात असलेली सर्व गॅस गोदामे बंद करून नागरिकांचा जीव वाचवावा. लोकांच्या जीवाशी खेळू नका. ताबडतोब या गोदामाला सील लावून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!