Monday, September 16, 2024
Homeताज्या बातम्यानिवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 'राष्ट्रवादी' अजित पवारांचीच, अजित पवार गटाला मिळाले 'पक्ष...

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘राष्ट्रवादी’ अजित पवारांचीच, अजित पवार गटाला मिळाले ‘पक्ष आणि चिन्ह’

निवडणूक आयोगाचा १४० पानांचा निकाल १४३ मुद्द्यांद्वारे निकाल

पुणे -महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. त्यानुसार पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. 

राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय दिलेला आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्रात, अजित पवारांनी सर्वाधिक आमदार, खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे, असा दावा केला होता. या आमदार-खासदारांचं प्रतिज्ञापत्रही अजित पवारांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं. तसंच आता आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचंही आयोगाला कळवलं होतं, यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांची बाजू मांडण्याबाबतची नोटीस दिली होती. पण शरद पवार यांनी सादर केलेली कागदपत्र मागे पडली आहे.

निवडणुक आयोगाचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

२ जुलैला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार गटाने, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांच्यासह ९ आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राष्ट्रवादीकडून ही कारवाई झाल्यानंतर दोन्ही गट निवडणूक आयोगात गेले होते.

अजित पवारांचा पक्ष हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या निकालात म्हटले आहे. अजित पवार गटाने काढलेला व्हीप आता ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. या निकालामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शरद पवार गट आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावतो काय, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!