Tuesday, October 15, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसंस्कृतीनिमगाव भोगी येथे माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे

निमगाव भोगी येथे माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे

शिरूर – निमगाव भोगी (ता.शिरूर) येथे माजी सैनिक महिला बचत गटाच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला.

यावेळी देशाच्या सुरक्षेसाठी कुटुंबाचा ,गावचा त्याग करत आपले कर्तव्य पार पडलेल्या माजी सैनिकांचे औक्षण करत त्यांना दीर्घायुष्य व सुदृढ आरोग्य प्राप्त होण्यासाठी येथील माता भगिनींनी राखी बांधली तर भगिनिंच्या सुरक्षेसाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा मांगल्याच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.

यावेळी शिरूर तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष राजाराम सांबारे,उपाध्यक्ष बनन फलके, खजिनदार तुकाराम रासकर , सचिव विठ्ठल जाधव ,महिला महिलाध्यक्ष रतन आसवले ,सचिव उज्वला इचके,सविता सांबारे, कमल लोखंडे, मीना जाधव ,बबीता,रासकर प्रिया रासकर, मार्गदर्शक नरेंद्र व्यवहारे, दत्तात्रय लोखंडे ,बाळासाहेब थोरात, सुभेदार रमेश पुंडे ,कार्याध्यक्ष साहेबराव असवले,संचालक चांगदेव रासकर बाळासाहेब लोंढे, बाळासाहेब राऊत ,राजाराम फलके, विलास सांबरे, दादा सांबरे , युवराज बनकर, मोहन गायकवाड, लक्ष्मण कोठावळे,सरपंच उत्तम व्यवहारे, चेअरमन नवनाथ शेवाळे ,संचालक चांगदेव रासकर , बाळासाहेब राऊत संचालक बाळासाहेब लोंढे , रामदास रासकर, गणपत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला सचिव उज्वला इचके यांनी केले तर ह भ प शांताराम मोढवे महाराज यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!