Sunday, June 16, 2024
Homeइतरनायगाव येथे 'क्रांतिज्योती 'काव्य संग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

नायगाव येथे ‘क्रांतिज्योती ‘काव्य संग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

काव्य संग्रहात महाराष्ट्रातील एकूण १०९ कवींच्या कवितांचा सहभाग

मिलिंदा पवार सातारा

खंडाळा – दिनांक ८ मार्च

नायगांव( ता.खंडाळा )येथे “क्रांतिज्योती” या काव्यसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून सुजन फौंडेशन यांच्या वतीने काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्रातील एकूण १०९ कवींनी यात सहभाग घेत सुजन फौंडेशन कडे कविता पाठविल्या होत्या.या कवितांचे पुस्तक प्रकाशन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगांव या जन्मभुमीत “क्रांतिज्योती” या पुस्तकाचे प्रकाशन करताना सावित्रीबाई फुलेंना काव्यसंग्रहाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.

नायगांवच्या सरपंच पूनम राजेंद्र नेवसे,राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राज्य समन्वयक दिपाली पांढरे, महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे,सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समितीच्या अध्यक्षा सुनंदा जाधव, युवा माळी संघटनेच्या सुनीता भगत,समता परिषदेच्या पुणे शहराध्यक्षा गौरी पिंगळे, पिंपरी चिंचवडच्या सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी रासकर खंडाळा पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी नेवसे,नायगांव ग्रामपंचायत सदस्य साधना नेवसे,सीमा एकतपुरे, दैनिक तरुण भारतचे सातारा उपसंपादक सुधीर जाधव व विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी काव्यसंमेलन संपन्न होत असताना या काव्य संमेलनाचे अध्यक्षपद कवि किशोर धरपडे यांनी भूषविले यावेळी वनिता बनकर यांना सावित्रीबाई फुले सामाजिक पुरस्काराने व सुनीता इंगळे यांना सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक मंचचे संस्थापक तुकाराम कोकाटे यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच नायगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.या काव्य संग्रहाचे संपादक म्हणून रोहिणी रासकर,अजित जाधव यांनी कामकाज पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज.तू.गार्डे यांनी केले आभार नायगाव पोलीस पाटील माधुरी नेवसे यांनी मानले.

“क्रांतिज्योती” काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांची नावे – प्रथम क्रमांक अनिता कांबळे व योगिता मापारी ,द्वितीय क्रमांक व्ही.एच. भागवत व अहिल्या भोजणे , तृतीय क्रमांक डॉ. निलम गायकवाड व सुधा चौधरी यांना देण्यात आला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!