Friday, May 24, 2024
Homeताज्या बातम्यानागपूर अधिवेशन - आमदार अशोक पवार वाघोलीच्या प्रश्नावर आक्रमक

नागपूर अधिवेशन – आमदार अशोक पवार वाघोलीच्या प्रश्नावर आक्रमक

विधानसभेच्या पायऱ्यांवर फलक झळकावत आमदार अशोक पवार यांनी वाघोली येथील ट्रॅफिक, पिण्याचे पाणी व सांडपाणी प्रश्नावर राज्य शासनाला आर्त हाक

आमदार अशोक पवार यांनी फलक झळकावल्याचे समजाध्यामावर प्रसारित होताच अनेक नागरिकांनी ठेवले व्हॉट्स ॲप स्टेटस

पुणे – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाचे व संबधित खात्यांच्या मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील वाघोली गावातली समस्यांकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे ! असा वाघोली येथील समस्यांचा फलक झळकावत राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आमदार अशोक पवार यांनी केला असून वाघोलीच्या ट्रॅफिक, पिण्याचे पाणी व सांडपाणी प्रश्नावर आमदार अशोक पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

वाघोली येथील वाहतूक कोंडी हा औद्योगिक वसाहती व नागरिकांसाठी कायमच डोकेदुखी ठरणारा गंभीर विषय असून याबाबत आमदार अशोक पवार यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर फलक झळकावत सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून सदर फलकात शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील वाघोली गावातील समस्यांकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे !१) रस्त्यांचा विकास करून ट्राफिकची समस्या दूर करा.२) पाण्याची गंभीर समस्या दूर करा.३) सांडपाण्याचे व्यवस्थापन करा.असे फलक झळकावले असून मोठ्या प्रमाणावर नागरीकीकरण होणाऱ्या व झपाट्याने विकसित होणारे वाघोली हे निमशहर असून येथील समस्या सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार आग्रही असतात.

आमदार अशोक पवार यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर वघोलीचा वाहतूक कोंडी, रस्ता विकसित करणे, पाण्याची समस्या व सांडपाणी व्यवस्थापन यांची समस्या मांडत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी फलक झळकावल्याने नागरिकांनी आभार व्यक्त करत.सदर फोटो आपल्या व्हॉट्स ॲप स्टेटसला ठेवत सोशल मीडियावरून पाठिंबा व्यक्त केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!