Saturday, July 27, 2024
Homeशिक्षणनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जागृतता निर्माण करणार - प्राचार्य मोहीते

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जागृतता निर्माण करणार – प्राचार्य मोहीते

प्राचार्य काकासाहेब मोहिते यांचा सन्मान करताना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके व इतर मान्यवर

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासगट सदस्यपदी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राचार्य मोहीते यांची निवड

कोरेगाव भीमा – शिक्रापूर ( ता .शिरूर) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात जागृकता व साक्षरता निर्माण करून प्रभावी अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असून शिरूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल तसेच विद्यार्थी,पालक,शिक्षक यांचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत व दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत असलेले समज,गैरसमज दूर होतील असे आश्वासन मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांना प्राचार्य मोहीते यांनी दिले. प्रतिपादन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मोहीते यांनी केले.

नुकतीच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासगट सदस्यपदी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राचार्य मोहीते यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचा मुख्याध्यापक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, सचिव प्राचार्य रामदास थिटे, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सहसचिव मारूती कदम,अशोक सरोदे उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!