कुलदीप मोहिते कराड
कराड – नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलीस स्टेशन यांच्यावतीने नवरात्र उत्सव शांततेत, सुरक्षितता व आनंदाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश देण्याकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उंब्रज येथे रुट मार्च करण्यात आला तसेच कायदा व सुव्यवस्था यामध्ये बाधा नाण्याचा प्रयत्न करणाऱ्याची गय केली जाणार नसल्याचा संदेश यावेळी देण्यात आला .
सदर रुट मार्च प्रसंगी उंब्रज पोलीस स्टेशन- माणीक चौक-धनलक्ष्मी मंदिर चौक-बाजारपेठ -शिवाजी महाराज चौक -पाटण तिकटणे- सर्विस रोड -चोरे रोड असा घेण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड ,पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील तारळे दुरक्षेत्र,पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, मसुर दुरक्षेत्र उंब्रज पोलीस स्टाफ व गृहरक्षक दल उंब्रज यांनी सहभाग घेतला. असाच रुट मार्च आवश्यकतेनुसार इतर मोठे व महत्त्वाचे गावांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.