Saturday, July 27, 2024
Homeइतरनवपरिवर्तन फौंडेशनच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या एक लाख चाळीस हजारांचे बिल भरत जाधव कुटुंबियांना...

नवपरिवर्तन फौंडेशनच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या एक लाख चाळीस हजारांचे बिल भरत जाधव कुटुंबियांना आधार : चित्तरंजन गायकवाड

मुलाच्या उपचारासाठी आलेल्या बिलाची रक्कम भरत देवदूतच बनले गायकवाड

प्रतिनिधी सुनील थोरात हवेली

कदमवाकवस्ती – दिनांक ११ फेब्रुवारी

कदमवाकवस्ती( ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती येथे राहणार्या मध्यम वर्गीय असणाऱ्या धनश्री जाधव यांच्या बाळाची प्रकृती स्थिर नसल्याने उपचारासाठी ४ दिवस बाळ हॉस्पिटलमध्ये होतं, बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर एक लाख पन्नास हजार रुपयांचे हॉस्पिटलचे बिल झाले. बिल पाहून बाळाचे आई वडील हवालदिल झाले .यावेळी जाधव दांपत्याने नवपरिवर्तनचे फांडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांना हाॅस्पिटलच्या बिलाविषयी व फोनवरून आपली बिकट परिस्थितीची कल्पना दिली.

माणुसकी धर्माचे पालन करत गायकवाड यांनी जाधव कुटुंब आर्थिक अडचणीत आहे त्यांना मदतीची गरज आहे त्यानुसार जाधव कुटुंबाना फक्त दहा हजार ही रक्कम भरायला लावली व बाकीच्या रक्कमेचे नियोजन नवपरिवर्तन फौंडेशनच्या माध्यमातून करण्यात येईल असे सांगितले. या आधाराने जाधव कुटुंबाला खूप मोठा आधार भेटला नवपरिवर्तन फांडेशनचे माध्यमातून राहिलेली रक्कम त्वरित भरण्यात आली. बाळाच्या कुटूंबियांनी चित्तरंजन गायकवाड यांच्या मदतीबाबत जाधव दांपत्याने चित्तरंजन जाधव हे आमच्या मदतीला धावून आले हे आमचे भाग्य आहे.कदमवाकवस्ती गावासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेत्याचा मला अभिमान आहे, असेच कार्य आपल्या हातून कायम घडो असे उद्गगार व्यक्त करुन त्यांचा यथोचित सन्मान केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!