Monday, September 16, 2024
Homeताज्या बातम्यानवनिर्वाचित सरपंच बापूसाहेब काळे यांनी पत्रकारांची वाजत गाजत काढली मिरवणूक ...!

नवनिर्वाचित सरपंच बापूसाहेब काळे यांनी पत्रकारांची वाजत गाजत काढली मिरवणूक …!

पत्रकारांचा सन्मान करत मिठाई वाटप करत कृतज्ञता व्यक्त करत गावच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार – नवनिर्वाचित सरपंच बापूसाहेब काळे

शिक्रापूर – पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा, लोकशाहीचा समृद्ध आधारस्तंभ तर समाजातील तळागाळातील लोकांच्या दीपस्तंभ असून आत्तापर्यंत मागील २३ वर्षांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत मोलाचे योगदान देत खंबीर पाठीशी उभे राहत गोरक्षण असो की इतर सामाजिक कामे असो सर्वांनी मोलाचे व अविस्मरणीय सहकार्य केले याबद्दल ऋण व्यक्त करत निमगाव म्हाळुंगी गावाचे नवनिर्वाचित सरपंच बापूसाहेब काळे यांनी पत्रकार बांधवांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत सन्मान चिन्ह व मिठाई देऊन मिठाई देत पत्रकारिता या क्षेत्राविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

निमगाव म्हाळुंगी येथे ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी, शिवराज्य प्रतिष्ठाण आणि भाजपा मन कि बात उत्तर पुणे जिल्हा यांच्या संबांधवांचा ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान चिन्ह व मिठाई देऊन गाजत मिरवणूक काढत सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान चिन्ह व मिठाई देऊन निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत च्या माध्यमातूनचे सरपंच बापूसाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सचिन चव्हाण, जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक मारुती निकम आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ लांडगे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.यावेळी जेष्ठ पत्रकार प्रवीणकुमार जगताप,शेरखान शेख, जालिंदर आदक, घनशाम तोडकर, उदयकांत ब्राम्हणे,निलेश जगताप,शरद रासकर यांनी मनोगत व्यक्त केली.

 सरपंच काळे यांनी यावेळी गावानं विश्वास दाखवला आणि  बिनविरोध निवडून देत गावानं जो विश्वास दाखवला तो  सार्थकी करून दाखवायचा आहे अशा शब्दात गावाकऱ्यांचे कौतुक केले. आणि आणि आपण सर्व पत्रकारांनी मला जी गेल्या 23 वर्षा पासून निस्वार्थपणे साथ दिली, आपण माझे कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातूम तळागाळातील समाजापर्यंत पोहचवले त्या बद्दल आपले मी कधीही ऋण फेडू शकणार नाही परंतु मला आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मी पाहत होतो आणि ती संधी आज मला मिळाली अशा प्रकारचे पत्रकारांचे कौतुक करून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून  बापूसाहेब बबनराव काळे यांनी आभार मानले.

गावातील सर्वसाधारण कुटुंबातील कवी आकाश भोरडे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवला असून निमगाव चे नाव प्रसिद्ध केले नुकताच त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल गावच्या वतीने त्यांचेअभिनंदन केले.यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर सुजाता चव्हाण, कामिनी नागवडे,अपेक्षा टाकळकर, वसंत भागवत, प्रदीप करपे, विठाबाई पवार या सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक नामदेव काळे, बाबुराव चौधरी,सागर कुसाळकर,कुणाल काळे, प्रज्वल काळे, उपस्थित होते. तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी पत्रकार निलेश जगताप यांनी सूत्रसंचालन केले आणि जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मारुती निकम सर यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी पत्रकार  राजाराम गायकवाड,  घनश्याम तोडकर,मयूर भुजबळ, गजानन गव्हाणे, आकाश भोरडे, तेजस फडके, भगवान खुर्पे, शरद रासकर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!