Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याधामारी येथे भीषण अपघातात माय लेकासह एका तरुणाचा मृत्यू

धामारी येथे भीषण अपघातात माय लेकासह एका तरुणाचा मृत्यू

मातेसह वीस वर्षांच्या दोन तरुणांना अपघातात गमवावा लागला जीव

बेल्हा-जेजुरी महामार्गावर धामारी (ता. शिरुर) आज रात्री नऊच्या सुमारास टेम्पो व दुचाकीच्या अपघातात माय लेकासह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो चालकही या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कोरेगाव भीमा – दिनांक ३ फेब्रुवारी.

बेल्हा-जेजुरी महामार्गावर धामारी (ता. शिरुर) येथे रात्री नऊच्या सुमारास टेम्पो व दुचाकीच्या अपघातात माय लेकासह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत दिलीप डोके (वय २०), विजया दिलीप डोके (वय ४०) व ओंकार चंद्रकांत सुक्रे (वय २०, तिघे रा. खडकवाडी, ता. आंबेगाव) अशी या तिघांची नावे आहेत.

याबाबत संपत चंदर डोके (वय ४५, रा. खडकवाडी) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी टेम्पो चालक अक्षय बबन साकोरे (रा. चांडोली, राजगुरूनगर) याच्याविरोधात गुन्हे दाखल केला आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी, धामारी येथे बेल्हा-जेजुरी महामार्गावरून संकेत डोके हा त्याची आई व एका मित्रासह त्याच्या ताब्यातील दुचाकीहून (एमएच १४ एचआर ७०७३) धामारी बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत होता. त्यावेळी शिक्रापूर बाजूने आलेल्या टेम्पोची (एमएच १४ जीयू ६८६०) त्यांच्या दुचाकी जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो चालक जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, हवालदार राजेश माने व राकेश मळेकर हे करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!