Wednesday, July 24, 2024
Homeइतरधर्म प्रसाराच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे प्रकार बेट भागात वाढत चालल्याची तक्रार

धर्म प्रसाराच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे प्रकार बेट भागात वाढत चालल्याची तक्रार

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन फाकटे गावात चर्चचे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मागणी, गावात एकही ख्रिश्चन धर्मीय व्यक्ती नाही

शिरूर – फाकटे ( ता.शिरूर) येथे गायरान गट नं १११ मध्ये २०२० पासून अतिक्रमण करुन चर्चचे बांधकाम केले आहे. फाकटे हे गाव श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव असून गावामध्ये कोणीही ख्रिश्चन धर्माची व्यक्तीनाही . तेथे जाणून बाजून बाहेरील लोकांनी हे अतिक्रमण करण्यासाठी गरीब लोकांना बळी पाडून तेथे चर्च उभारली आहे, त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना मोठया प्रमाणात दुखावल्या गेल्या आहे.

At Phakte (Shirur) a church has been constructed by encroachment in Gayran Group No. 111 since 2020. Only this village is sanctified by Lord Ram Prabhu and there is no Christian person in the village no Outsiders have knowingly set up churches there by victimizing the poor people for this encroachment, thus hurting the sentiments of Hinduism to a great extent. (Complaints that conversions are increasing in island areas in the name of spreading religion)

भविष्यात तेथे दंगली सारखे प्रकार घडू शकतात. तसेच तेथील स्थानिक हिंदू लोकाना त्यांच्या कार्यक्रमाचा त्रास सहन करावा लागत आहे.(Complaints that conversions are increasing in island areas in the name of spreading religion) त्यामुळे तेथील चर्चचे तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी जालिंदर बाळू राळे व गोरक्ष कारभारी ढमाले यांनी लेखी निवेदनाद्वारे फाकटे ग्रामपंचायतीकडे केली आहे.तसेच पोलिस प्रशाससाने तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.(Complaints that conversions are increasing in island areas in the name of spreading religion)

धर्म प्रसाराच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे प्रकार बेट भागात वाढत चालले असून ही गंभीर बाब असून सर्व नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन शिवसेनेचे ( ठाकरे गटाचे )तालुका प्रमुख गणेश जामदार यांनी केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!