Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रधर्मवीर संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासाकामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासाकामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती व वढु बु.ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा समाधी स्थळाच्या विकास कामाला शासनातर्फे भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच धर्मवीर संभाजी महाराज विकास आराखडा बाबत धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती व तसेच समस्त ग्रामस्थांना विचारात घेण्यात यावे , छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक या शब्दाचा विशेषण न वापरता धर्मवीर या शब्दाचेच विशेषणाचे प्रयोजन करण्यात यावे त्याचप्रमाणे श्री क्षेत्र वढु बु ठिकाणी होणाऱ्या पुढिल पुण्यतिथीस मुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहावे असे निवेदन देण्यात आले.

श्री क्षेत्र वढू बुद्रुक तालुका शिरूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी होत असते या कार्यक्रमासाठी दरवर्षी राजकीय धार्मिक ऐतिहासिक व सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतात म्हणून या पुण्यतिथी पासून २१ मार्च २०२३ ला मुख्यमंत्र्यांनी स्वतः हजेरी लावावी व प्रत्येक कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी येण्याची प्रथा पाडावी अशा आशयाचे निवेदन संभाजी महाराज स्मृती समिती व वढू बुद्रुक ग्रामस्थ यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

जिल्हा नियोजन समितीची मंत्रालय मुंबई येथे बैठक झाली या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.त्याचप्रमाणे संभाजी महाराज समाधी स्थळाचा पुनर्विकास करत असताना ऐतिहासिक बांधकाम तसेच ठेवत व भुईकोट किल्ले तसेच ठेवून स्मारकाचे सुशोभीकरण करावे व हे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी यावेळी मान्यवरांनी केली.यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे रामभाऊ सासवडे, शिवसेना पुणे जिल्हा उपसंपर्कप्रमुख अनिल काशीद,स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, वढूचे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे, शांताराम भंडारे, अनिल भंडारे, हरिभाऊ भंडारे ,राहुल भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.फोटो ओळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना उपस्थित मान्यवर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!