Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्याधर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्याग अन्‌ कर्तृत्वाचा तेजस्वी इतिहास राष्ट्रीय शिक्षण...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्याग अन्‌ कर्तृत्वाचा तेजस्वी इतिहास राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या NCERT मध्ये समावेश करावा

कोरेगाव भीमा, ता. ९ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्याग अन्‌ कर्तृत्वाचा तेजस्वी इतिहास राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) माध्यमातून राष्ट्रीय अभ्यासक्रमात आला तरच धर्मवीर शंभुराजांच्या या जाज्वल्य  पराक्रमाचा खरा इतिहास देशातील तरुणाईला समजेल अन्‌ तो युगानुयुगे प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिविंग फाऊंडेशनचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी केले.

     आर्ट ऑफ लिविंग फाऊंडेशनचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे भेट देत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी वढु बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. अंजली प्रफुल्ल शिवले यांनी स्मृतिचिन्ह देवून त्यांचा यथोचित सन्मान केला. तर वीर बापुजी शिवले स्मारक मंडळ, शंभुराजे क्रिडा संघ, श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान व ग्रामस्थांच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

      सध्याच्या धर्मांतरणाबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, सध्या किरकोळ प्रलाेभनासाठी कमजोर लोक धर्म व नावही बदलतात मात्र कोणत्याही आमिषाला बळी न पडता असह्य यातना सहन करीत शुरवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी ३२ व्या वर्षी आत्मबलिदान दिले, हे अत्यंत प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र अशीच मर्यादित माहिती असलेल्या इतिहासात शंभुराजांच्या अत्यंत पराक्रमी व्यक्तीमत्वाचा आदर्श इतिहास आजच्या तरुणाईसमोर राष्ट्रीय अभ्यासक्रमातून आला पाहीजे. 

       तुळजा भवानी मातेवर नितांत श्रद्धा असलेल्या छत्रपती शिवाजीराजेंना त्यांच्यामुळेच स्वराज्य संरक्षणासाठी बळ मिळत असे. त्यामुळे ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजीराजे व शंभुराजे यांचे भक्ती, शक्ती, युक्ती हे गुणही तरुणाईने आत्मसात केले पाहीजेत, असे सांगताना त्यांनी येथील वीरता व शुरता जपून ठेवणाऱ्या शिवले परिवाराचेही योगदान मोठे असल्याचे सांगत कौतुक केले. 

       तसेच मरकळ आश्रमानजिक असलेल्या वढु बुद्रुक परिसराच्या विकासासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशन’च्या माध्यमातून शक्य ते प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.   तसेच शिवले घराण्याचा नामोल्लेख करत गौरवोद्गार काढले.

     यावेळी विद्यमान सरपंच अंजली प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच सारिका अंकुश शिवले, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, अनिल शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, शांताराम कटके, केसनंदचे सरपंच प्रमोद हरगुडे, माजी उपसरपंच संतोष शिवले, लाला तांबे, रमाकांत शिवले, संजय शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे, कृष्णा आरगडे, संगीता सावंत, स्वप्निल शिवले, सोसायटी अध्यक्ष कांताराम  आरगडे, सचिन शिवले, बबनराव शिवले, संभाजी  शिवले, गोरक्ष शिवले, साहेबराव भंडारे, पेरणेचे उपसरपंच अक्षय वाळके, माजी सरपंच रुपेश ठोंबरे, शिवाजी वाळके, माजी अध्यक्ष राजेंद्र आहेर, संजय शिवले, हरी शिवले, मंगेश शिवले, नीलम देशमुख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

     माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी स्वागत केले. तर सचिन शिवले यांनी सुत्रसंचालन केले. तर अंकुश शिवले यांनी आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!