Monday, June 17, 2024
Homeस्थानिक वार्ताधर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प आदर्श- अप्पर जिल्हाधिकारी समिक्षा गोकुळे

धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प आदर्श- अप्पर जिल्हाधिकारी समिक्षा गोकुळे

धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पाचा इतर गावांनी आदर्श घेतला पाहिजे

कोरेगाव भीमा – दिनांक २४ जुलै
माहिती सेवा वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष धर्मराज बोत्रे व पिंपळे जगताप ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पिंपळे जगताप ( ता.शिरूर) या ठिकाणी धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प साकारत आहे. आत्तापर्यंत या वनराई १५ हजार झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करण्यात आले आहे.

संभाजीनगर येथील अप्पर जिल्हाधिकारी समिक्षा गोकुळे यांच्या शुभहस्ते पिंपळे जगताप याठिकाणी ३०० झाडांचे वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली. २ आक्टोंबर पासून सुरू केलेले वृक्षारोपण आत्तापर्यंत १५ हजार झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करण्यात आले. कमी कालावधीत १५ हजार देशी झाडे लावण्यात आल्याबद्दल त्यांनी सर्व वृक्ष मित्रांचे कौतुक केले.तसेच त्याठिकाणी वृक्षदाण करणारे उद्योजक सागर भाडळे, उद्योजक राहुल गव्हाणे यांचे अप्पर जिल्हाधिकारी समीक्षा गोकुळे यांनी आभार मानले.
बकोरी देवराई वनराई प्रकल्प, धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प अशाप्रकारे शेकडो प्रकल्प साकारण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगत एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी हजर राहण्याचा योग आला व एक वेगळे समाधान लाभल्याचे हडपसर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार शरद पाबळे, या प्रकल्पासाठी लाखो रुपयाची झाडे दान देणारे वाघोली येथील उद्योजक सागर भाडळे, या प्रकल्पासाठी पोकलेन मशीन व आवश्यक असेल ती मदत करणारे डिंग्रजवाडीचे माजी सरपंच उद्योजक राहुल गव्हाणे, वृक्ष रोपण कामात सक्रिय श्रमदान करणारे संदिप ढफळ ,अजित रणसींग, प्रविण रणसींग, मंगेश जाधव,प्रकल्पाचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर कुमार साईराज तांबे, जगताप गुरुजी, सुर्यकांत टाकळकर गुरुजी, राजेंद्र तांबे,शिवम परीवाराचे कार्यकर्ते, डिंग्रजवाडीचे माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे, वेदांत रणसींग, उद्योजक रामदास दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प,बकोरी देवराई वनराई प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांसाठी अहोरात्र मेहनत करणारे वृक्ष मित्र धर्मनाथ बोत्रे, चंद्रकांत वारघडे हे उपस्थित होते.
आलेल्या सर्व मान्यवरांचे व श्रमदानासाठी आलेल्या सर्व वृक्ष मित्रांचे आभार सुर्यकांत टाकळकर गुरुजी यांनी मानले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांच्या माध्यमातून २०१७ पासून बकोरी देवराई वनराई प्रकल्प बकोरी येथे साकारत आहे त्याठिकाणी ३०हजार झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करण्यात आले आहे. चंद्रकांत वारघडे हे वनराई प्रकल्पासाठी अनेक वर्षांपासून आग्रही असून त्यांचे या क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. त्यांनी बकोरी देवराई वनराई प्रकल्प मोठ्या कष्टाने राबवला असून कुटुंबातील घटकाप्रमाने प्रत्येक वृक्षाची काळजी घेतली आहे. त्यामुळे तेथील डोंगर परिसर मोठ्या प्रमाणात हिरवागार झालेला पाहायला मिळते.चंद्रकांत वारघडे व त्यांचे कुटुंब ,मित्र परिवार व समाज सेवक,तरुण मित्र व विद्यार्थी यांच्या सहकार्याने झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम कृतियुक्त राबवली असून त्यांनी पिंपळे जगताप येथील धर्मनाथ देवराई प्रकल्प यासाठी योगदान देत असून यासाठी सर्व समाज घटक मोठ्या प्रमाणावर एकत्र येत आहेत व सामाजिक जबाबदारी जपत वृक्षारोपणाची जबाबदारी पार पाडत आहेत.

Swarajya rashtra
पिंपळे जगताप येथे धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पात वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित मान्यवर
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!