Wednesday, October 9, 2024
Homeक्राइमधक्कादायक : स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाला गरम चुन्याच्या निवळीत ढकलले

धक्कादायक : स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाला गरम चुन्याच्या निवळीत ढकलले

क्रूरपणाचा कळस माणुसकीला काळीमा फासणारी घटना





प्रतिनिधी मिलिंद लोहार -सातारा

सातारा – दिनांक १० फेब्रुवारी

सदर घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान महादेव मोरे (वय- २९ ) या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे उकळत्या चुन्याच्या निवळीत तरूणाला ढकलून देण्यात आले. या तरुणाला नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मारहाण झालेल्या मुलाचे शरीर ठीक ठिकाणी भाजले आहे. जखमी तरुणावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मारहाण करणारे संशयित हे दारू पिलेले असल्याचे तक्रारदार यांचे सांगणे आहे.

या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तरूण ९ टक्के भाजला असल्याची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. तसेच संबधित आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असेही सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!