Friday, June 21, 2024
Homeक्राइमधक्कादायक ......शिरूर तालुक्यात एका किशोरवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

धक्कादायक ……शिरूर तालुक्यात एका किशोरवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

आई वडील लहानपणीच वारलेल्या किशोरवयीन मुलाला बळजबरीने दारू पाजत नराधमाचा अनैसर्गिक अत्याचार

कोरेगाव भीमा – शिक्रापूर ( ता.शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीत एक खळबळ जनक घटना घडली असून आई वडील लहानपणीच वारलेले असून आजीआजोबा सांभाळत असलेल्या किशोरवयीन मुलावर बळजबरीने दारू पाजत नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची अमानुष घटना घडली असून यामुळे शिक्रापूर पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.Shocking ……unnatural assault on a teenager in Shirur taluka

याप्रकरणी पीडित किशोरवयीन मुलाने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सुरेश सुब्राव ऐवळे ( रा.जतेगव खुर्द, ता.शिरूर) या नराधमास शिक्रापूर पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहे.( Pune Crime News)

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील फिर्यादी नुसार मिळालेली माहिती अशी की, दिनांक १७ जुलै रोजी पीडित किशोरवयीन युवक ( वय १७ वर्षे १० महिने २४ दिवस) एका इसमासोबत जातेगांव खुर्द येथील शेतात ऊस फोडण्याचे कामा करीता गेला होता. तेथे उस फोडण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर दुपारी ३.३० वाजण्याचे सुमारास बैल गाडीतून घरी येत असताना आरोपी सुरेश ऐवळे याने जबरदस्तीने पीडित किशोरवयीन युवकाला खाली उतरविले व म्हणाला की, आपल्याला दुस-या शेतात कामाला जायचे सांगून मोटार सायकलवर त्याच्या शेतामध्ये नेऊन जबरदस्तीने दारू पाजली.

त्यानंतर तो पीडित किशोरवयीन युवकास ऊसाचे शेतात घेवुन गेला. तेथे सुरेश ऐवळे याने युवकाची पॅन्ट शर्ट काढत बळजबरी केली. पीडित युवकाने त्याचे पासुन सुटण्याचा प्रयत्न केला असता, सुरेश ऐवळे याने किशोरवयीन युवकाच्या तोंडावर हाताने फाईट मारल्याने किशोरवयीन युवकाच्या नाकाला जखम झाली. त्यानंतर सुरेश याने युवकाला पकडून ठेवुन पुन्हा झटापट करीत असताना त्याचे हाताला हिसका मारून पळून युवक पळाला.( Pune Gramin police)

त्यावेळी किशोरवयीन युवकाला त्याचे भोसारीचे दाजी जातेगांव चौकात दिसल्यावर युवक त्यांच्या जवळ थांबलेला असताना त्यांनी युवकाला विचारले “तु का पळतो आहे?” असे विचारले असता युवकाने झालेला प्रकार सांगीतला. नंतर नराधम सुरेश ऐवळे हा मागुन आला व त्याने युवकाला व त्याचे दाजी यांना घाण घाण शिवीगाळ दमदाटी केली. ( शिक्रापूर police station) त्यानंतर संबधित पीडित युवकाने शिकापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली यावेळी शिक्रापुर पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलता जपत संबधित युवकाला तातडीने औषधोपचार करत नराधम सुरेश ऐवळे याला पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने बेड्या ठोकल्या.

किशोरवयीन युवकाचे आईवडील लहानपणीच वारले असून त्याचा आजीआजोबा सांभाळ करत आहेत. शेतात कष्टाचे काम करून किशोरवयीन युवक आपल्या परीने आजीआजोबांना मदत करत असतो या झालेल्या घटनेने किशोरवयीन युवक घाबरून गेला शिक्रापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पीडित किशोरवयीन युवकाला तातडीने उपचार देत धीर देण्याचे महत्वपूर्ण काम पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले. तसेच संबधित युवकावर अत्याचार करणारा नराधम सुरेश ऐवळे याला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!