Wednesday, April 24, 2024
Homeक्राइमधक्कादायक...शिक्रापुरात शेतीसह प्लॉटिंगमध्ये अफूची लागवड; शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई

धक्कादायक…शिक्रापुरात शेतीसह प्लॉटिंगमध्ये अफूची लागवड; शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई पोलिसांच्या छाप्यात १ हजार २२६ झाडे जप्त

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने एका शेतीसह प्लॉटिंगमध्ये छापा टाकून अफूची १ हजार २२६ झाडे जप्त केली आहेत. झाडे लावणाऱ्या सुशील शिवाजीराव ढमढेरे व सत्यभामा सुरेश थोरात या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

स्वराज्य राष्ट्र
प्रातिनिधिक फोटो साभार इंटरनेट

शिक्रापूर येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात एका इसमाने शेतात तर एका महिलेने घराशेजारी प्लॉटिंगमध्ये अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलीस नाईक रोहिदास पारखे, किशोर शिवणकर, महिला पोलीस नाईक गिता बराटे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सुशील ढमढेरे याने त्याच्या शेतातील लसूनच्या वाफ्यामध्ये काही अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसले.

दरम्यान पोलिसांनी शिवाजी शिवाजीराव ढमढेरे (वय ३८ वर्षे) यांनी शिक्रापूर येथील महालक्ष्मी नगर येथील गट नं १२६३ येथे  ६६ अफूच्या रोपे त्यांचे वजन ७.२९४ किलो ग्रॅम तर  ३६४७००/- किंमतीच्या रोपांची लागवड केली होती तर सत्यभामा सुरेश थोरात ( वय ५५ वर्षे) यांनी शिक्रापूर येथील महालक्ष्मी नगर येथील गट नं १६६३/१ मध्ये ११६० अफूची रोपे वजन ८.१०८ किलो ग्रॅम असून त्यांची  ४,०५,४०० किंमत असून त्यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे  गुंगिकरक  औषधी द्रव्ये आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी येथील अफूची ६६ झाडे जप्त केली, त्यांनतर लगेचच येथील सत्यभामा थोरात यांच्या घराची पाहणी केली असता त्यांनी घराच्या शेजारीच प्लॉटिंगमध्ये तब्बल ११६० अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आले,दरम्यान पोलिसांनी सदर झाडे जप्त केली आहेत.

  याबाबत पोलीस निरीक्षक  निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!