Saturday, May 25, 2024
Homeक्राइमधक्कादायक .. मुलानेच जन्मदात्या बापावर केला कोयत्याने जीवघेणा हल्ला

धक्कादायक .. मुलानेच जन्मदात्या बापावर केला कोयत्याने जीवघेणा हल्ला

शिरूर – दि. ०७ रावडेवाडी (ता. शिरूर) येथील लक्ष्मण तांबे यांच्यावर त्यांच्याच पोटच्या मुलाने ओंकार उर्फ लक्ष लक्ष्मण तांबे ( वय१६ वर्ष ) याने जमिनीच्या वादातून पाठलाग करून रस्त्यामध्ये अडवून कोयत्या सारख्या हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आहे. (The The son attacked the father )

हल्ल्यात जखमी झालेले लक्ष्मण तांबे यांना दोन पत्नी आहेत. ते दुसऱ्या पत्नीसोबत भोसरी येथे राहतात. त्यांचा मुलगा ओंकार उर्फ लक्ष हा पहिल्या पत्नीचा मुलगा असून त्यांच्यात जमीनीच्या वाटपावरून वाद होता. त्या संदर्भात दि. ०७ रोजी दुपारी ४ वाजता कोर्टाची तारीख उरकुन वडिल लक्ष्मण तांबे हे मलठण येथे जात असताना त्यांना नानीचा मळा येथे रस्त्यावर अडवून त्यांचा मुलगा ओंकार उर्फ लक्ष लक्ष्मण तांबे यानेकोयत्याच्या सहाय्याने जोरदार हल्ला चढवला. The son attacked the father .

या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील ऊपचारासाठी के.ईएम हॉस्पीटल पुणे येथे पाठवण्यात आले आहे. घटना कळताच घटनास्थळी टाकळी हाजी औटपोस्टचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, सहाय्यक फौजदार माणिक मांडगे, कॉन्स्टेबल विशाल पालवे यांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!